मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपचा सफाया, काँग्रेसचं कम बॅक! अपक्षांकडून मोठा गेम

राजस्थान पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या गृहजिल्ह्यात, भरतपूर जिल्हा परिषदेत भाजपने मोठा पराभव पत्करला, तर काँग्रेसने 21 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. या निकालातून भाजपवरील जनक्षोभ स्पष्ट दिसतोय. पंचायत समितीमध्ये अपक्षांनीही दोन्ही प्रमुख पक्षांना कडवी झुंज दिली.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपचा सफाया, काँग्रेसचं कम बॅक! अपक्षांकडून मोठा गेम
bhajanlal sharma
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 4:10 PM

प्रत्येक निवडणुकीत निर्विवाद यश मिळवणाऱ्या भाजपला राजस्थानच्या मतदारांनी सातवं आस्मान दाखवलं आहे. राजस्थानच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या होमपीचवरच म्हणजे भरतपूर जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद निवडणुकीत सफाया झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठी हार पत्करावी लागली आहे.

भरतपूर जिल्हा परिषदेच्या 31 जागांसाठी मतदान झालं होतं. या 31 पैकी 21 जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने एक जागा जिंकली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मतदारसंघातच भाजपचा सफाया झाला आहे. यावरून नागरिकांचा भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर रोष असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Loading...

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 17 जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेसला अवघ्या 14 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी संपूर्ण पिक्चरच पालटला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत केवळ आपली स्थिती मजबूत केली नाही तर सत्ता नसतानाही राजकीय दृष्ट्या भाजपवर मातही केली आहे.

कोण जिंकलं?

भरतपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 31 जागा आहेत. या सर्व जागांचे निकाल आले आहेत. या 31 पैकी 21 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर भाजपच्या खात्यात फक्त 9 जागा आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला 8 जागांचे नुकसान झालं आहे. तसेच जिल्हा परिषदही भाजपच्या हातून गेली आहे.

अपक्षांकडून गेम

जिल्हा परिषदेच्या तुलनेत पंचायत समितीचं चित्र थोडं वेगळं आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला अनेक ठिकाणी फायदा मिळाला आहे. मात्र, पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीत अपक्षांनी भाजपचा सर्वाधिक खेळ बिघडवला आहे.

वैर पंचायत समितीत भाजपने 3, काँग्रेसने 9 आणि अपक्षांनी 6 जागा जिंकल्या आहेत. सेवर पंचायत समितीत भाजपने 7, काँग्रेसने 4 आणि अपक्षांनी 10 जागा जिंक्लया आहेत. तर नदबई पंचायत समितीत भाजपने 6, काँग्रेसने 2 आणि अपक्षांनी 19 जागांवर विजय मिळवाल आहे. भुसावर पंचायत समितीत भाजपने केवळ एकच जागा जिंकली आहे. या ठिकाणी काँग्रेसने 11 आणि अपक्षांनी ७ जागा जिंकल्या आहेत. रुपवासमध्ये भाजपने 7, काँग्रेसने 7 आणि अपक्षांनी 9 जागा जिंकल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us