AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका, इराण युद्धादरम्यान भारताला मोठा झटका; देशावर महासंकट, नव्या अंदाजानं झोप उडाली

अमेरिका आणि इराणमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला आहे. मात्र अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. यातच आता भारतासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून, त्यामुळे चिंता वाढली आहे.

अमेरिका, इराण युद्धादरम्यान भारताला मोठा झटका; देशावर महासंकट, नव्या अंदाजानं झोप उडाली
भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 5:27 PM
Share

इराण आणि अमेरिकेमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला आहे. मात्र अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. कच्च्या तेलाची वाहतूक आणि एलपीजी गॅससाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. जगाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आणि गॅसची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के वाहतूक या मार्गाने होते. हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला आहे. एकीकडे इराण आणि अमेरिकेमुळे ऊर्जा पुरवठा बाधित झाला आहे तर दुसरीकडे यंदाच्या मान्सूवर अल निनोचा प्रभाव पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतासमोर आला दुहेरी संकट निर्माण झालं आहे. एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भविष्यात महागाई वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. तर यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतात सरासरीच्या 92 टक्के एवढ्या पावसाचा अंदाज आहे. सुरुवातीला पावसाचं प्रमाण चांगलं असेल त्यामुळे खरीप हंगामात पिकाची लागवड होईल, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात अशीच परिस्थिती कायम राहणार असल्यानं, खरीप हगांमातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसून त्याचा थेट परिणाम हा जीडीपीवर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी चांगला राहील, असा अंदाज आयएमएफकडून वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.5 टक्क्यांच्या आसपास राहील असं आयएमएफने म्हटलं आहे. इतर काही देशांच्या जीडीपीमध्ये घट होणार असल्याचा अंदाज देखील आयएमएफकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र जर दीर्घ काळ स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद राहिला आणि अल निनोचा प्रभाव मान्सूनवर दिसून आला तर मात्र अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?