दिवाळीआधी कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA वाढणार? लगेच जाणून घ्या
आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक या वर्षाच्या दुसऱ्या डीए वाढीची वाट पाहत आहेत, जी सप्टेंबरमध्ये जाहीर केली जाणार होती. महागाई भत्ता 58 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, अशी अपेक्षा आहे.

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR दरवाढी) यासंदर्भात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी DA वाढीची घोषणा केली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि कामगार महासंघाने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून लवकरच निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
या वर्षीची पहिली महागाई वाढ जानेवारीपासून लागू झाली. 1 जुलैचा बदल अद्याप प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी सरकार मोठी घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, केंद्रीय कर्मचारी आणि कामगार महासंघाने अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्वरित कारवाईची विनंती केली आहे. त्यात नमूद केले आहे की, 1 जुलै 2025 पासून लागू झालेला महागाई भत्ता/डीआर चा हप्ता अद्याप जाहीर केलेला नाही, साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो आणि 3 महिन्यांची थकबाकी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिली जाते. या दिरंगाईमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये निराशा वाढत आहे.
मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सर्व अहवालांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर असे झाले तर 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होईल. जानेवारीपासून DA आणि डीआर 2 टक्क्यांनी वाढवून 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्यात आला आणि जर 3 टक्के नवीन वाढ झाली तर ती 58 टक्क्यांपर्यंत वाढेल.
डीए महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लेबर ब्युरोकडून दर महिन्याला जारी होणाऱ्या कंझ्युमर प्राइस इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल वर्कर्सच्या (सीपीआय-आयडब्ल्यू) आधारे सरकार या वाढीची गणना करते. सरकार गेल्या 12 महिन्यांच्या सीपीआय-आयडब्ल्यू सरासरीसाठी एक विशेष फॉर्म्युला वापरते, जो 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत तयार करण्यात आला आहे. DA (%) = [(12-महिन्यांची सरासरी सीपीआय-आयडब्ल्यू – 261.42) ÷ 261.42] × 100
अपेक्षेप्रमाणे, यावेळी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढून 58 टक्के होऊ शकतो, तर यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल. त्याची गणना करणे सोपे आहे. एंट्री लेव्हल कर्मचाऱ्याच्या 18,000 रुपयांच्या मूळ पगाराच्या आधारावर 55 टक्के त्याला आतापर्यंत 9,900 रुपये डीए मिळत होता, परंतु त्यात 3 टक्के वाढ केल्यानंतर 58 टक्के गणना केली तर दरमहा थेट 540 रुपयांची वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 10,440 रुपये होईल. त्यानुसार त्यांना वर्षाला 6480 रुपयांचा फायदा होणार आहे.
