मोठी बातमी! टॅरिफनंतर भारतासाठी मोठी गुडन्यूज, त्या रिपोर्टने डोनाल्ड ट्रम्प यांची उडाली झोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला असून, यामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात असतानाच आता भारतासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे, यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मूडीज, एस अँड पी आणि फिच सारख्या प्रमुख रेटिंग एजन्सींनी टॅरिफवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेलं टॅरिफ हे अल्पकालीन आव्हान असल्याचं म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकालीन दृष्टिकोण स्थिर आणि सकारात्मक आहे. 650 अब्ज डॉलर पेक्षा जास्त असलेली गंगाजळी, निर्यातीमधील विविधता आणि देशांतर्गंत वाढत असलेली मागणी या अशा गोष्टी आहेत, ज्या भारताला टॅरिफ संकटातून सहज बाहेर काढू शकतात, असा या रेटिंग संस्थांचा अंदाज आहे.
या रेटिंग संस्थानुसार अमेरिकेनं टॅरिफ लावण्यानंतर त्याचा सर्वाधिक प्रभाव हा अॅल्युमिनियम, स्टील, टेक्सटाइल्स आणि वाहानाचे विविध पार्ट या उद्योग व्यावसांयांवर पडू शकतो, कारण हे उद्योग बऱ्याच अंशी अमेरिकेच्या बाजार पेठेवर अवलंबून आहेत. देशातील फार्मा क्षेत्र हे टॅरिफपासून सुरक्षित आहे, तसेच टॅरिफचा आयटी क्षेत्रावर देखील फार काही परिणाम होणार नाही. मात्र अमेरिकेनं जर व्हिसासंदर्भात नियमांमध्ये काही बदल केल्यास त्याचा परिणाम या क्षेत्रावर होऊ शकतो, असंही मूडीजने म्हटलं आहे.
मूडीजने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन कोणताही परिणाम होणार नाही, भारताचा आर्थिक ग्रोथ रेट हा 6.5-7 टक्के एवढा राहणार आहे. देशांतर्गत वाढलेली मागणी, निर्यातीमधील विविधता, मोठ्या प्रमाणात असलेली गंगाजळी या सर्व गोष्टींमुळे भारत यातून लवकर बाहेर पडेल. दीर्घाकाळासाठी भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिर असेल असं मुडीजने म्हटलं आहे. दरम्यान एस अँड पीचा देखील असाच अंदाज आहे. हा रिपोर्ट भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. येत्या 28 ऑगस्टपासून भारतावर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.
