AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पक्ष फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपने पुन्हा एकदा…

राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यानंतर आता पक्षाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! पक्ष फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपने पुन्हा एकदा...
Arvind KejrivalImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 24, 2026 | 5:43 PM
Share

आम आदमी पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राघव चड्ढा यांनी शुक्रवारी (२४ एप्रिल) मोठी घोषणा करताना सांगितले की, त्यांच्यासह पक्षाचे इतर सहा राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीवर निशाणा साधत म्हटले की, हा आता जुना पक्ष राहिला नाही. यावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले की, “भाजपने पुन्हा एकदा पंजाब्यांसोबत धक्का (अन्याय) केला.”

कोण कोण भाजपमध्ये सामील होणार?

१. राघव चड्ढा

२. अशोक मित्तल

३. स्वाती मालीवाल

४. हरभजन सिंग

५. संदीप पाठक

६. विक्रमजीत सिंह साहनी

७. राजेंद्र गुप्ता

ईडीचा छापा टाकला आणि फोडले – संजय सिंह

दुसरीकडे, ‘आप’ खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले, “ऑपरेशन लोटसचा खेळ खेळला जात आहे. आमच्या खासदारांना फोडले जात आहे. त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले जात आहे. ईडी-सीबीआयचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक मित्तल यांच्याकडे ईडीचा छापा पडला होता. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ईडीचा छापा पडला आणि त्यांना फोडले. याचा अर्थ भीती दाखवून आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ‘ऑपरेशन लोटस’ चालवले जात आहे.”

‘मी त्यांच्या मैत्रीच्या लायकीचा नव्हतो कारण…’ – राघव चड्ढा

खासदार राघव चड्ढा म्हणाले, “मी गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वतःला पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर केले. कारण मला त्यांच्या गुन्ह्यात सहभागी व्हायचे नव्हते. मी त्यांच्या मैत्रीच्या लायकीचा नव्हतो. कारण मी त्यांच्या गुन्ह्यात सामील नव्हतो. आमच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर राजकारण सोडणे किंवा आपल्या अनुभवासह सकारात्मक राजकारण करणे. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की, राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश खासदार स्वतःला भाजपमध्ये विलीन (मर्ज) करत आहोत.”

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल