मोठी अपडेट, झेलेन्स्की यांनी का केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन? संपूर्ण चर्चाच समोर;भारताकडे केली ही खास विनंती

Volodymyr Zelensky : एक मोठी अपडेट समोर येत आहे. उद्यापासून भारतावर 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी होत आहे. त्यातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. काय केली त्यांनी विनंती?

मोठी अपडेट, झेलेन्स्की यांनी का केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन? संपूर्ण चर्चाच समोर;भारताकडे केली ही खास विनंती
झेलेन्स्की, नरेंद्र मोदी
| Updated on: Aug 26, 2025 | 11:19 AM

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नवी दिल्लीने स्वातंत्र्यदिनी युक्रेनला सुखद धक्का दिला होता. युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात कुतुबमिनारवर न्हाऊन निघाला होता. तर पंतप्रधानांनी सुद्धा युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर झेलेन्स्की यांनी मोदींना धन्यवाद दिले. शांतता आणि संवादासाठी भारताच्या भूमिकेबद्दल आभार मानले. युद्ध सुरू झाल्यापासून नवी दिल्ली त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे ते म्हणाले. मास्कोसोबत युद्ध सुरू असताना आणि अमेरिकेने भारताविरोधात टॅरिफ वॉर लादल्यानंतर झेलेन्स्की यांची ही भूमिका समोर आली आहे.

धन्यवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या एक्स खात्यावर याविषयीची एक पोस्ट लिहिली आहे. त्यात, त्यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. शातंता आणि संवादाबाबत भारताच्या प्रयत्नांबाबत त्यांनी कौतुक केले.

रशियासोबतच युद्ध थांबवण्यासाठी भारताचे प्रयत्नाबाबत झेलेन्स्की यांनी भाष्य केले. युरोपच्या सुरक्षेला इंडो पॅसिफिक प्रदेश आणि त्यापुढे जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण जगाला हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची मोठी आवश्यकता भासत असाना युद्ध थांबवण्यासाठी भारताच्या पुढाकाराविषयी झेलेन्स्की यांनी पुन्हा आवाहन केले. याविषयीच्या राजनीतीला बळकटी देणारा प्रत्येक निर्णय हा केवळ युरोपच नाही तर इंडो-पॅसिफिक आणि त्याही पुढे सुरक्षा धोरण राबवेल असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला.

तर या भावनिक पोस्टबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केले आहे. भारत नेहमीच शांततेच्या बाजूने उभा आहे. संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीने संघर्षावर तोडगा काढणे आणि कायमस्वरुपी शांतता नांदण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे मोदी म्हणाले. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला दिल्लीने पाठिंबा दिल्याची भूमिका मोदी यांनी अधोरेखित केली. दरम्यान भारत हा रशियाकडून इंधन खरेदी करून त्यांना युद्धासाठी रसद पुरवत असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. उद्यापासून 27 ऑगस्ट 2025 रोजीपासून टॅरिफ सुरू होणार आहे. तर ट्रम्प यांचे मित्र झेलेन्स्की हे भारताचे शांतता प्रयत्नासाठी आभार व्यक्त करत आहेत, हे नवी दिल्लीचे यश मानण्यात येत आहे.