AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, तृणमूलमधून खासदारांचा गटही बाहेर पडणार? थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी…

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वीच तृणमूलमध्ये नाराज असलेल्या 58 आमदारांचा गट पक्षातून बाहेर पडला आहे. त्यानंतर आता ममना बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, तृणमूलमधून खासदारांचा गटही बाहेर पडणार? थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी...
ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 3:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या 58 आमदारांचा गट पक्षातून बाहेर पडला आहे. त्यानंतर आमदारांच्या या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी  देखील देण्यात आली. हा ममात बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या धक्क्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तृणमूलमधून आता आमदारांनंतर खासदारासांचा गट देखील बाहेर पडण्याची शक्यता आहे. पक्षात घडामोडींना वेग आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आहेत, त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची एक गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर हा खासदारांचा गट केंद्रीय मंत्री भूपेंद्र यावद यांच्या घरी पोहचला आहे, इथे या खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची देखील उपस्थिती होती.

त्यामुळे आता आजच हा खासदारांचा गट तृणमूलमधून बाहेर पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला शुखेंदु शेखर रॉय यांची देखील उपस्थिती होती. शुखेंदु शेखर रॉय  यांनी नुकताच आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, तसेच त्यांनी तृणमूलमधील आपल्या सर्व पदांचा देखील राजीनामा दिला आहे. शुखेंदु शेखर रॉय हे देखील या बैठकीला उपस्थिती असल्यामुळे आज ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो, पक्षातील काही खसादर पक्षाची साथ सोडू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. केवळ तृणमूल काँग्रेसचाच नाही तर ममता बॅनर्जी यांचा देखील पराभव झाला. दरम्यान त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. आधी आमदार पक्षातून बाहेर पडले, आता खासदार देखील पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत.

Follow Us
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...