Maithili Thakur Election Result : ब्लू प्रिंटचा प्रश्न पण तिला वाटलं ब्लू…उत्तरामुळे व्हायरल झालेली मैथिली ठाकूर आघाडीवर की पिछाडीवर?
Maithili Thakur Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. मैथिली ठाकूर निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघाकडे सगळ्यांच लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी ब्लू प्रिंटच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरावरुन मैथिली ठाकूर हे नाव देशभरात चर्चेत आलेलं. मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत की पिछाडीवर? जाणून घ्या.

Maithili Thakur Election Result : आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. एनडीए आणि महाआघाडीमध्ये मुख्य टक्कर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान आहे. एनडीमध्ये भाजप, जेडीयू हे महत्वाचे पक्ष आहेत. महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आहे. आतापर्यंतचे जे कल हाती आलेत, त्यानुसार भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात काँटे की टक्कर दिसून येतेय. बिहार निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती विशेष चर्चेत आहेत. दरभंगामधील अलीनगरची सीट यापैकीच एक आहे. अलीनगरमधून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. मैथिली ठाकूर एक तरुण उमेदवार आहेत. बिहारमध्ये तिचा एक विशेष चाहता वर्ग आहे.
काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे मैथिली ठाकूर हे नाव देशभरात सर्वांना माहित झालं. पत्रकाराने मैथिली ठाकूर यांना मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारला. पण त्यांना तो फिल्म बद्दल विचारतोय असं वाटलं. त्यावर मैथिली यांनी ‘मी हे सर्वांसोबत कसं शेअर करू? ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे’ असं उत्तर दिलं. या उत्तराचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे मैथिली ठाकूर यांना अजून प्रसिद्धी मिळाली.
मैथिली ठाकूर आघाडीवर की पिछाडीवर?
मैथिली ठाकूर निवडणूक लढवत असलेल्या अलीनगरच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. भाजपने या ठिकाणाहून मैथिली ठाकूरला निवडणूक रिंगणात उतरवून ही जागा हाय-प्रोफाइल बनवली. 6 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात येथे मतदान झालं होतं. निकालाचे प्राथमिक कल आलेत त्यानुसार अलीनगरमधून मौथिली ठाकूर आघाडीवर आहे.
View this post on Instagram
कसा आहे हा मतदारसंघ?
अलीनगरमध्ये दोन ब्राह्मण उमेदवारांमध्ये मुख्य टक्कर आहे. राजकीय, सांस्कृतिक आणि जातीय समीकरणं या दृष्टीने अलीनगरची सीट महत्वपूर्ण आहे. ब्राह्मण, रविदास आणि मागास जाती यामुळे इथलं राजकीय गणित नेहमी जटिल असतं. मैथिली ठाकूर पहिल्यांदा राजकारणात उतरल्या आहेत. मैथिली यांची लोकप्रियता मोठी आहे. भाजपाने त्यांना इथून उमेदवारी देऊन एक चान्स घेतला आहे. युवा चेहरा देऊन मतदारांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न आहे.
