Bihar Election Final Results 2025 LIVE : बिहार निवडणुकीत काहीतरी काळबेरं झालं आहे – खासदार चव्हाण

Bihar Assembly Election Results 2025 LIVE Counting and Updates in Marathi : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाली आहेत. मोठे यश एनडीएला मिळाले आहे.

Bihar Election Final Results 2025 LIVE : बिहार निवडणुकीत काहीतरी काळबेरं झालं आहे - खासदार चव्हाण
Bihar Election Results
| Edited By: | Updated on: Nov 16, 2025 | 4:58 PM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरूवात झालीये. हळूहळू करून सत्ता नेमकी कोणाच्या हाती येणार याचे काैल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. सर्वच राजकीय पक्षांनी बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केली. विशेष म्हणजे यंदा बिहारमध्ये मतदानाचा टक्का चांगलाच वाढला. हे कोणासाठी फायदेशीर ठरले हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वांचे लक्ष आता आज 14 नोव्हेंबर 2025 च्या बिहारच्या 243 जागांसाठीच्या मतमोजणीकडे आहे. कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाच्या पदरी निराशा पडते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिहारच्या महिलांना 10 हजार रूपये प्रत्येकी राज्य शासनाने निवडणुकीच्या तोंडावर दिले होते. भाजपा सुरूवातीच्या कलांनुसार आघाडीवर दिसत आहे.

 

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Nov 2025 07:55 PM (IST)

    नाशिक: भगूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत फूट

    नाशिकच्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली आहे. या दोन्ही पक्षांनी शिवसेना शिंदे गटाला महायुतीपासून दूर ठेवले आहे. हे दोन्ही पक्ष शिंदे गटाच्या विरोधात एकत्रित लढणार आहेत.

  • 15 Nov 2025 07:42 PM (IST)

    जळगाव: सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ

     

    आज सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावत सोन्याचे दर 1लाख 26 हजार 587 प्रति तोळावर पोहोचले आहेत. चांदीचे दर तीनशे रुपयांनी घसरले आहेत. चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 61 हजार 710 रुपये इतका झाला आहे.

  • 15 Nov 2025 07:25 PM (IST)

    बिहार निवडणुकीत काहीतरी काळबेरं झालं आहे – खासदार चव्हाण

    बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवावर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे. बिहार निवडणुकीत निश्चितच काहीतरी काळेबेर झालं आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

  • 15 Nov 2025 07:10 PM (IST)

    पुणे: निलंबित तहसीलदार येवले याला अटकपूर्व जामीन मंजूर

    पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील निलंबित तहसीलदार येवले याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे नाव होतं. येवले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, आता न्यायालयाने एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

  • 15 Nov 2025 07:00 PM (IST)

    भायखळा परिसरात मातीच्या ढिगाऱ्यात दबून दोघांचा मृत्यू

    भायखळा परिसरात मातीच्या ढिगाऱ्यात दबून दोघांचा मृत्यू

    इमारतीच्या फाऊंडेशन व पाइलिंग कामादरम्यान झाला अपघात

    मातीचा ढिगारा कोसळून, दोघांचा मृत्यू तिघांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू

     

     

  • 15 Nov 2025 06:54 PM (IST)

    आज दादरमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक

    आज दादरमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची महत्त्वाची बैठक

    बैठकीला मुंबईतील महत्वाचे नेते उपस्थिती

    मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, मनसे नेते नितीन सरदेसाई यांची बैठकीला हजेरी

     

  • 15 Nov 2025 06:39 PM (IST)

    संगमनेरमध्ये वाहनात सापडली एक कोटी रुपयांची कॅश

    संगमनेरमध्ये वाहनात सापडली एक कोटी रुपयांची कॅश

    शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मोठी रक्कम हस्तगत

    ही रक्कम नेमकी कुणाची? आणि कशासाठी वापरली जाणार होती? याबाबत तपास सुरू

    पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी रक्कम सापडल्याने खळबळ

    शहर हद्दीत येणाऱ्या वाहनांवर निवडणूक आयोगाची करडी नजर

  • 15 Nov 2025 06:20 PM (IST)

    कोपरगावमध्ये धक्कादायक घटना, बहीण, भावाचा बुडून मत्यू

    कोपरगाव तालुक्यात धक्कादायक घटना

    जनावरे चारायला गेलेल्या बहीण – भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

    तालुक्यातील चांदेकसारे हद्दीतील पाण्याने भरलेल्या खाणीमध्ये दुपारच्या सुमारास घडली घटना

    डाऊच खुर्द येथील सार्थक गणपत बढे वय – 19 वर्ष , सुरेखा गणपत बढे वय – 18 वर्ष या दोघा बहिण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

    कोपरगाव तालुका पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यातून काढले मृतदेह बाहेर , ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू

  • 15 Nov 2025 04:53 PM (IST)

    राहुल गांधी यांनी बिहार 2025 च्या निकालांवर मौन बाळगले

    बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाआघाडीच्या खराब कामगिरीनंतर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली, ज्यामध्ये राहुल गांधी देखील उपस्थित होते. ते आता बैठक सोडून गेले आहेत आणि निकालांवर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

  • 15 Nov 2025 04:41 PM (IST)

    बिहारचा विजय उत्तर प्रदेशच्या विजयाशी जुळू शकत नाही: अखिलेश यादव

    समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले आहेत की बिहारच्या विजयाची तुलना उत्तर प्रदेशच्या विजयाशी करता येणार नाही. ते म्हणाले, “निवडणुका आपल्याला विजय आणि पराभवाचे धडे शिकवतात. भाजपने दावा करायला सुरुवात केली आहे की त्यांना महिलांकडून जास्त मते मिळाली आहेत. तुम्ही किती काळ 10000 रुपये देणार? किती काळ सन्मानाचे जीवन देणार?”

  • 15 Nov 2025 04:18 PM (IST)

    दिल्ली बॉम्बस्फोट: पोलिसांनी नूहमधून दोन जणांना ताब्यात घेतले

    दिल्ली बॉम्बस्फोटांप्रकरणी पोलिसांनी हरियाणातील नूह येथून दोघांना अटक केली आहे. अल फलाह विद्यापीठातील अनेक डॉक्टरांचाही शोध घेत आहेत.

  • 15 Nov 2025 04:07 PM (IST)

    प्रशांत किशोर उद्या पाटणा येथे पत्रकार परिषद घेणार

    जन सूराज्यचे संस्थापक प्रशांत किशोर उद्या सकाळी 11 वाजता पाटणा येथे बिहार निवडणूक 2025 आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

  • 15 Nov 2025 03:50 PM (IST)

    मुक्तगिरीवर आज श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात होणार आढावा बैठक

    दुपारी ३ नंतर बैठकांना होणार सुरवात. बिहार निवडणुक निकालानंतर शिवसेनेची मुंबई महापालिकांसाठी होणार बैठक.. बैठकीत महायुतीत जागा लढवण्यावर होणार मंथन

  • 15 Nov 2025 03:40 PM (IST)

    चंद्रकांत खैरे यांचे मोठे विधान

    आमच्या येथे पण पैठण मध्ये असेच झाले, आणि त्यांना सांगितले टीव्ही वर बघा बिहार मध्ये एकच जागा आली. माझी विनंती आहे की, सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी, आपण निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल. काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे

     

  • 15 Nov 2025 03:30 PM (IST)

    भंडाऱ्यात महाविकास आघाडीत तणाव? ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी

    आघाडी न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवू….प्रदीप खोपडे यांचा इशारा. ठाकरे बंधूंचा ब्रँड ताकदीवर; मुंबई महापालिकेत फडका फडकणार- प्रदीप खोपडे

  • 15 Nov 2025 03:20 PM (IST)

    काँग्रेसकडून जयश्री बोरकर, भाजपकडून मधुरा मदनकर मैदानात

    नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांची लढत; काँग्रेस-भाजपने घोषणा केली. भंडारा निवडणूक तापली; दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर. स्वबळावरची निवडणूक! उर्वरित पक्षांचे उमेदवार आज-उद्यात होणार जाहीर….

  • 15 Nov 2025 03:09 PM (IST)

    डोंबिवलीत प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामगुडेलाअटक

    तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. विष्णूनगर पोलिसांची धडक कारवाई –३७ तोळे सोने, BMW कार आणि 4 आयफोन जप्त! डोंबिवलीतील उच्चशिक्षित तरुणीला आमिष दाखवून सव्वा किलो सोनं आणि रोख 51 लाख घेत लावला होता चूना. वन मिलियन’ फॉलोवर्स असलेल्या इन्स्टाग्राम स्टारचा काळा चेहरा उघड!

  • 15 Nov 2025 02:57 PM (IST)

    मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही- वर्षा गायकवाड

    मनसेसोबतच्या आघाडीवरील प्रश्नावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिल आहे. “मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही” असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी टोमणा मारत मनसेला थेट उत्तर दिलं आहे.

     

     

     

  • 15 Nov 2025 02:49 PM (IST)

    मुंबईत BMCची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार : रमेश चेन्निथला

    मुंबईत BMCची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढे जाऊन यावेळेसच्या BMCची निवडणुकीत वेगळे वारे वाहताना दिसण्याची शक्यता आहे.

  • 15 Nov 2025 02:34 PM (IST)

    नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर

    नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. नागरी वस्तीत बिबट्या आल्याने नक्कीच परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेची वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आता ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 15 Nov 2025 02:13 PM (IST)

    अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली, पार्थ पवार जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती

    अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. पार्थ पवार जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अजितदादांनी शाहा यांनी जमीन प्रकरणी सविस्तर माहिती तसेच वस्तूस्थितीबद्दल माहिती दिल्याचं बोललं जात आहे.

  • 15 Nov 2025 01:50 PM (IST)

    सिल्लोड नगर परिषदेत अब्दुल सत्तार लढणार स्वबळावर

    सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने आघाडी घेतली आहे आणि आज नगराध्यक्ष पदाचे दावेदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी सिल्लोड शहरात प्रचार रॅली काढली होती, या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते. सिल्लोड नगर परिषद शिवसेना अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे..

  • 15 Nov 2025 01:40 PM (IST)

    भास्करराव जाधव यांच्या कन्येन भरला उमेदवारीचा अर्ज

    चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनातर्फे नेते आमदार भास्करराव जाधव यांची कन्या सौ. कांचन सुमित शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • 15 Nov 2025 01:17 PM (IST)

    जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याची दहशत कायम!

    कल्याण नगर महामार्गालगत ओतूर येथे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • 15 Nov 2025 01:09 PM (IST)

    निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे- शरद पवार

    सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते अधिकाराचा वापर पैसे वाटप करत आहे. निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही यावर चर्चा करून काही तरी करू. पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली. याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच” असे शरद पवार म्हणाले.

  • 15 Nov 2025 11:59 AM (IST)

    मानव-वन्यजीव संघर्षावर वनविभागाने काढला तोडगा

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असल्याने सध्या ग्रामीण जनतेत पदोपदी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांना बेजार झालेल्या गुराख्यांनी त्यांच्या रक्षणार्थ वनविभागाने तोडगा काढला असून, त्रिशूल व इतर साहित्य देऊन स्वरक्षण करण्याचे आत्मबल निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे

  • 15 Nov 2025 11:50 AM (IST)

    बिबट्याला ठार मारण्याची ऑर्डर काढा

    बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील गावकरी एकवटले.बिबट्यावर कारवाई करा अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा तीन गावातील रहिवाश्यांनी दिला आहे. बिबट्याला ठार मारण्याची ऑर्डर काढा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. दोन चिमूरड्यांवर बिबट्याचा हल्ला तर पाच वर्षीय प्रियांका पवार या चिमुर्डीचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला.

  • 15 Nov 2025 11:40 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घसरण;रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग

    नंदुरबार जिल्ह्यात तापमानाच्या पारा चांगलाच घसरला असल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पाऊस चांगला झाल्याने जमिनीत ओलावा असल्याने रब्बी हंगामाला याच्या चांगला फायदा होणार असल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होत असते यात सर्वाधिक गहू कांदा हरभरा या पिकांची लागवड होत असते तर पपई आणि केळीचे देखील लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असते यासाठी पेरणीला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाला असून या नुकसानीतून सावरत रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकरी लागल्या असून लवकरच १००% पेरण्या पूर्ण होण्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • 15 Nov 2025 11:30 AM (IST)

    गुवाहाटी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड

    मुंबईहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या गुवाहाटी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आसनगाव स्थानक दरम्यान मोठा बिघाड झाल्याची माहिती प्रवासी संघटनेने दिली आहे. यामुळे कसारा दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सेवांमध्ये विस्कळीत असून कसारा ला येणारी कसारा लोकल रद्द झाली आहे. अप आणि डाउन मार्गावरील दोन्ही गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर इंजिन दुरुस्तीचे काम करीत असून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.

  • 15 Nov 2025 11:20 AM (IST)

    इंद्रायणी नदी काठ वारकऱ्यांच्या गर्दीने गेला फुलून

    आळंदी मध्ये वैष्णवांचा मेळा जमलाय.आळंदी मध्ये कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली असून आज कार्तिकी एकादशीनिमित्त आणि 17 तारखेला होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.. इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेला आहे. ज्ञानबा तुकाराम यांचा जयघोष टाळ मृदुंगाचा मंजुळ आवाज यामुळे इंद्रायणी घाटावर धार्मिक वातावरण निर्माण झालंय.

  • 15 Nov 2025 11:10 AM (IST)

    गोंदियातील 36 गावांचा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद

    गोंदियातील 36 गावांचा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. वीज पुरवठा खंडीत केल्याने हा प्रकार घडला आहे. या महिनाभरातून दोनवेळा ही योजना बंद झाली.50 हजार नागरिकांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.

  • 15 Nov 2025 11:00 AM (IST)

    यवतमाळमध्ये शरद पवार यांना धक्का

    यवतमाळमध्ये माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम ठोकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का बसला आहे. अजित पवार यांचे माझ्यावर उपकार शरद पवार यांनी फक्त आश्वासन दिले कधीच जबाबदारी दिली नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

  • 15 Nov 2025 10:58 AM (IST)

    तुळजापूर मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले

    ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर टीका… जिल्ह्यात फोपावणाऱ्या ड्रग्स रॅकेटची मूळं तुळजापूर मध्ये असून त्याला स्थानिकचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील खतपाणी घालत आहेत असा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केलाय… पुढच्या पिढीचे भवितव्य बरबाद करणारी लोकं नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे आहेत. त्यांना बेचिराग करण्याचे काम तुळजापूर मधील जनतेने करावं असेही खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले…

  • 15 Nov 2025 10:45 AM (IST)

    धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला..

    धुळ्यात आज 8.2 तापमानाची नोंद… तापमान कमी झाल्याने थंडीमध्ये वाढ नागरिकांची पांजरा नदी किनारी सकाळी फिरण्यासाठी गर्दी… शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचा नागरिक पादरा नदी किनारी येतात फिरायला… गेल्या आठवड्याभोरा पासून धुळे जिल्ह्याचे तापमान आठ अंशावर…

  • 15 Nov 2025 10:25 AM (IST)

    बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

    नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निकवेल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ… सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद… संध्याकाळच्या सुमारास शेतशिवारात मुक्त संचार… नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण… वनविभागाकडे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी… बागलाण तालुक्यात सतत बिबटे दिसत असल्याने अतिरिक्त बंदोबस्ताचीही मागणी

  • 15 Nov 2025 10:10 AM (IST)

    संत ज्ञानेश्वर महाराजच मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत आज कार्तिकी एकादशी निमित्ताने वैष्णवांचा मेळा भरलाय… पहाटे संजीवन समाधीवर पवमान अभिषेक व विधीवत पूजाअर्चा करण्यात आली… यावर्षी अभिषेक व पूजा अर्चा करण्याचा मान शहापूर तालुक्यातील शंकर गणू बेरे आणि पत्नी निर्मला शंकर बेरे या दांपत्याला मिळाला… आज मंदिरात देवस्थान कडून विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं असून मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलय…

  • 15 Nov 2025 10:00 AM (IST)

    भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी पक्ष प्रवेशावरून दिलीप माने यांना डिवचलं

    रखडलेल्या भाजप प्रवेशावर आमदार सुभाष देशमुख आणि काँग्रेस माजी आमदार दिलीप माने यांच्यात शाब्दिक जुगलबंदी. पक्षात येणाऱ्याने पक्षासाठी किमान दोन-तीन वर्ष काम करावे, आल्या आल्या तिकीट मागणार असाल तर येऊ नका असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना हे अधिकार दिले असतील तर चांगली गोष्ट आहे दिलीप माने म्हणाले. मात्र कदाचित आमदारांना अधिकार दिले असतील तर पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष यांना काहीच अधिकार नाहीत असे मला वाटते

  • 15 Nov 2025 09:51 AM (IST)

    आळंदीत आज वैष्णवांचा मेळा

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत आज कार्तिकी एकादशी निमित्ताने वैष्णवांचा मेळा भरलाय. पहाटे संजीवन समाधीवर पवमान अभिषेक व विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. यावर्षी अभिषेक व पूजा अर्चा करण्याचा मान शहापूर तालुक्यातील श्री शंकर गणू बेरे, सौ निर्मला शंकर बेरे या दांपत्याला मिळाला. आज मंदिरात देवस्थानाकडून विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं असून मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलय.

  • 15 Nov 2025 09:40 AM (IST)

    नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

    नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निकवेल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद. संध्याकाळच्या सुमारास शेतशिवारात मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण. वनविभागाकडे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. बागलाण तालुक्यात सतत बिबटे दिसत असल्याने अतिरिक्त बंदोबस्ताचीही मागणी.

  • 15 Nov 2025 09:22 AM (IST)

    धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला

    धुळ्यात आज 8.2 तापमानाची नोंद. तापमान कमी झाल्याने थंडीमध्ये वाढ. नागरिकांची पांजरा नदी किनारी सकाळी फिरण्यासाठी गर्दी. शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचा. नागरिक पांजरा नदी किनारी येतात फिरायला. गेल्या आठवड्याभरापासून धुळे जिल्ह्याचे तापमान आठ अंशावर.

  • 15 Nov 2025 08:48 AM (IST)

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.

    ठाकरे यांच्या पक्षातील बांद्रातील आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडून बांद्रा येथे सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे.  वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये 23 रस्त्यांकरिता 54कोटींचा निधी मंजूर अशा आशयाचे बॅनर  झळकले .

     

  • 15 Nov 2025 08:23 AM (IST)

    यवतमाळ- माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम

    यवतमाळ- माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम केल्याने  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का बसला आहे.

    अजित पवार यांचे माझ्यावर उपकार आहेत,  शरद पवार यांनी फक्त आश्वासन दिले ,कधीच जबाबदारी दिली नाही, असे आरोप त्यांनी केले.

  • 15 Nov 2025 08:04 AM (IST)

    नाशिक मध्ये थंडीचा कडाका कायम

    नाशिक मध्ये थंडीचा कडाका कायम, शहरातील तापमान गेल्या आठवड्या भरापासून 10 अंशाच्या आसपास आहे.  पुढच्या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीवर धुक्याची चादर पसरली.

  • 15 Nov 2025 07:43 AM (IST)

    मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

    मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार स्थानकादरम्यान मेगाब्लॉक,  करी रोड, चिंचपोकळी, मशीद बंदर स्थानकादरम्यान लोकल थांबणार नाहीत.

  • 15 Nov 2025 07:33 AM (IST)

    – कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत कायम

    कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत कायम आहे. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 2 दिवसांपूर्वी येथेच बिबट्याने दुचाकीवर झडप मारल्याने एकजण गंभीर जखमी झाला होता. बिबट्या दबा धरुन बसत असूनही वनविभागाचे दुर्लक्ष. चालत्या कारआणि दुचाकीवर बिबट्या झडप मारत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 15 Nov 2025 07:22 AM (IST)

    जम्मू-काश्मीरच्या नौगाम पोलिस स्टेशन परिसरात भीषण स्फोट, 7 ठार

    जम्मू-काश्मीरच्या नौगाम पोलिस स्टेशन परिसरात भीषण स्फोट होऊन 7 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 15 Nov 2025 06:55 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  ते सुरतमधील निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्टेशनला भेट देतील. तसेच मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर (MAHSR) च्या प्रगतीचा आढावा घेतील.

  • 14 Nov 2025 08:43 PM (IST)

    सोलापूर : हॉटेल मालकाकडून कर्मचाऱ्याला नग्न करुन मारहाण

     

    माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात एका हॉटेल मालकाचा आगाऊपणा समोर आला आहे. हॉटेल मधील एका कर्मचाऱ्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेलचा मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण केली आहे. हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुकीबद्दल या मालकाने ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

  • 14 Nov 2025 08:33 PM (IST)

    गडचिरोली : अंमली पदार्थ तस्करी पोलीसांनी पकडली, 1 कोटी 20 लाखाच्या मुद्देमाल जप्त

    गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्करी सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास 1 कोटी 20 लाखाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे तस्करी सुरु असताना ही कारवाई करण्यात आली. गर्द हिरव्या रंगाचे पाने, फुले, बोंडे व बिया अशा प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात गांजाची तस्करी करण्यात येत होती.

  • 14 Nov 2025 08:29 PM (IST)

    आळंदी : कार्तिकी एकादशीनिमित इंद्रायणी तीर आणि मंदिर परिसर उजळला

    देवाच्या आळंदीत कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या 750 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित संजीवन समाधी मंदिर, इंद्रायणी नदी काठ आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजला आहे. या विद्युत रोषणाईने इंद्रायणी तीर आणि मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

  • 14 Nov 2025 08:15 PM (IST)

    काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी झाली आहे – PM मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ‘आज काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी झाली आहे. ही काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आहे. आणि काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा त्यावरच चालत आहे.’

  • 14 Nov 2025 07:59 PM (IST)

    देशासाठी काँग्रेसकडे सकारात्मक दृष्टिकोन नाही: पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना म्हटले की, गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत पक्ष तीन अंकी यश मिळवू शकला नाही. काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आता केवळ नकारात्मक राजकारण बनला आहे. काँग्रेसकडे देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन नाही.

  • 14 Nov 2025 07:49 PM (IST)

    युनेस्कोच्या यादीत छठचा समावेश करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे: पंतप्रधान

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे सरकार छठला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी काम करत आहे. संपूर्ण देश आणि जगाला त्याच्या सांस्कृतिक महत्त्वाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी, छठपूजेदरम्यान, छठी मैय्याची गाणी गुंजली आणि प्रत्येकजण या पवित्र उत्सवात सहभागी होताना दिसत होता.

  • 14 Nov 2025 07:41 PM (IST)

    बिहारमध्ये आता तुष्टीकरणाला जागा नाही: पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की बिहारमध्ये आता तुष्टीकरणासाठी जागा नाही. बिहारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की जनता जामिनावर असलेल्यांना पाठिंबा देणार नाही. बिहारने हे दाखवून दिले आहे की जनतेचा विश्वास कायम आहे. नवीन सरकारसह, एनडीए आता बिहारमध्ये २५ वर्षांच्या सुवर्ण प्रवासाकडे वाटचाल करत आहे. बिहारने हे सुनिश्चित केले आहे की जंगलराज बिहारच्या या महान भूमीवर कधीही परत येणार नाही.

  • 14 Nov 2025 07:39 PM (IST)

    दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये कुठेही फेरमतदान नाही: पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान म्हणाले की, जंगल राजवटीदरम्यान बिहारमध्ये काय घडायचे हे तुम्हाला माहिती आहे. मतदान केंद्रांवर उघडपणे हिंसाचार होत असे. मतपेट्या लुटल्या जात होत्या. आज त्याच बिहारमध्ये विक्रमी मतदान होत आहे. ते शांततेत मतदान करत आहे. प्रत्येकाचे मतदान नोंदवले गेले, प्रत्येकाने त्यांच्या मर्जीनुसार मतदान केले. पुनर्मतदानाचे आकडे देखील या बदलाची साक्ष देतात. 2005 पूर्वी शेकडो ठिकाणी पुनर्मतदान केले जात होते. 1995 मध्ये, दर हजार मतदान केंद्रांवर पुनर्मतदान करावे लागले. त्यानंतर, निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये कुठेही पुनर्मतदान करण्याची आवश्यकता नव्हती.

  • 14 Nov 2025 07:31 PM (IST)

    महिला आणि युवक हे MY सूत्र आहे: पंतप्रधान मोदी

    एक म्हण आहे, लोहा लोहे को काटता है. बिहारमध्ये लांगूलचालन करणारा my फॉर्म्युला केला होता. पण आजच्या विजयाने नवीन सकारात्मक एमवाय माय फॉर्म्युला दिला आहे. तो आहे महिला आणि युथ. आज बिहार देशाच्या ज्या राज्यांमध्ये आहे, जिथे सर्वाधिक तरुणांची संख्या आहे. त्यात प्रत्येक जात आणि धर्माचे लोक आहेत. त्यांची इच्छा आहे. त्यांची आकांक्षा आहे. त्यांच्या स्वप्नांनी जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युल्याला उद्ध्वस्त केलं आहे. मी बिहारच्या तरुणांचं अभिनंदन करतो.

  • 14 Nov 2025 07:20 PM (IST)

    ‘फिर एकबार एनडीए सरकार,’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं संबोधन

    हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे. मला आनंद याचा आहे की, या ठिकाणीही मखान्याची खीर सर्वांना देण्यात आली आहे. आम्ही तर जनता जनार्दनाचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीने जनतेचं हृदय खूश करत असतो. आम्ही तर जनता जनार्दनाचं हृदय चोरून बसलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण बिहारने दाखवून दिलंय की पुन्हा एकवार एनडीए सरकार. फिर एकबार एनडीए सरकार.

  • 14 Nov 2025 07:17 PM (IST)

    बिहारमध्ये जंगलराजाला नो एन्ट्री : जे पी नड्डा

    दिल्लीत भाज मुख्यालयात बिहारमधील विजयाचा जल्लोष केला जात आहे. या जल्लोष सभेत संबोधित करताना जे पी नड्डी यांनी मतदारांचे आभार मानले. नड्डा यांनी बिहारमध्ये जंगलराजाला नो एन्ट्री असल्याचं सांगितलं.तसेच लोकांनी विकासाला मत दिलं, असंही नड्डा म्हणाले.

  • 14 Nov 2025 07:03 PM (IST)

    बिहारच्या जनतेचं NDA ला नाही तर लाडक्या बहिणीला बहुमत : एकनाथ खडसे

    बिहारच्या जनतेने NDA ला नाही तर लाडक्या बहिणीला बहुमत दिलं आहे. लाडकी बहीण योजना मध्यप्रदेशातून महाराष्ट्र वरून आता बिहारला पोहोचली आहे. इथे 1500 रुपये दिले .तर तिकडे 10 हजार रुपये दिले. एनडीएला बिहारमध्ये 10 हजाराच्या प्रलोभनामुळे यश प्राप्त झालं आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

  • 14 Nov 2025 06:56 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने एनडीए विरोधकांची स्थिती बिकट – भरत गोगावले

    बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.’नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि एनडीए विरोधकांची स्थिती जनतेने स्पष्ट केली आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

  • 14 Nov 2025 06:47 PM (IST)

    बिबटे वाढायला लागले तर मग कसं होईल – मंत्री गिरीश महाजन

    बिबट्यांना कुत्रा शिकार करण्यासाठी सोपा प्राणी आहे. त्यामुळे बिबटे घरातून कुत्रे पळवत आहेत. बिबट्याची मादी एका वर्षात दोन वेळा पिल्ले देते. एका वर्षात आठ बिबटे वाढायला लागले तर मग कसं होईल. ही बाब अतिशय गंभीर आहे , मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंटला निर्देश दिले आहेत. माझ्याकडे यासंदर्भात जबाबदारी दिली पाहिजे. तर बिबट्यांकडून होणारे हल्ले आणि उपायोजना करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

  • 14 Nov 2025 06:29 PM (IST)

    सर्व ठिकाणी महायुतीचे नगरसेवक नगराध्यक्ष येऊ दे ! – राजन साळवी यांचे तुळजाभवानीला साकडे

    महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महायुतीचे नगरसेवक नगराध्यक्ष येऊ दे ! शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी श्री तुळजाभवानीला साकडं घातले आहे.धाराशिव आणि तुळजापूर येथे शिवसेनेचे निरीक्षक माजी आमदार राजन साळवी यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आठही नगरपालिकेत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

  • 14 Nov 2025 06:15 PM (IST)

    पुणे भोंदूगिरी प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

    भोंदूगिरी करून कोट्यवधी फसवणूक प्रकरणातील आरोपी वेदिका पंढरपूरकर,कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडके यांची पोलीस कोठडी संपल्याने पुणे पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून त्यांना २७ नोव्हेंबर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • 14 Nov 2025 05:57 PM (IST)

    भाजप कार्यकर्त्यांचा बिहारमधील विजयानंतर जालन्यात ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

    बिहार निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळतोय. जालन्यामध्ये भाजप कार्यालयासमोर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. तलेच एकमेकांना पेढेही भरवले. माजी आमदार भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी यावेळी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.

  • 14 Nov 2025 05:50 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना संबोधित करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. बिहार निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं. बिहार निवडणुकीच्या निकालातून मोदींचा करिष्मा पाहायला मिळाला. त्यानंतर आता मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

  • 14 Nov 2025 05:40 PM (IST)

    हुश्श, अखेर बिबट्या जेरबंद, वन विभागाला मोठं यश

    नाशकात अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बिबट्यामुळे परिसरात गेल्या काही तासांपासून भीतीचं वातावरण होतं.

  • 14 Nov 2025 05:21 PM (IST)

    Bihar Election Results : राहुल गांधींना जनतेनं जागा दाखवली – नरेश मस्के

    जनतेनं बिहार निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना जागा दाखवली

    नरेश मस्के यांची बिहार निकवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया

    काँग्रेसला झटकून टाकत हद्दपार केले

    मस्के यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    बिहारची जनता सुज्ञ, विकास आणि प्रगतीला मतदान झाले- मस्के

     

  • 14 Nov 2025 05:19 PM (IST)

    नाशिकच्या गंगापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

    नाशिकच्या गंगापूर परिसरात 2 बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या 2 पैकी 1 बिबट्या पळून गेला. तर एका बिबट्याचा शोध सुरु आहे. बिबट्या नागरी वस्तीत शिरल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच या बिबट्याने 2-3 जणांवर हल्ला केला. त्यामुळे या बिबट्याला अंधार होण्याआधी पकडण्याचं आव्हान वनविभागासमोर आहे.

  • 14 Nov 2025 05:13 PM (IST)

    दादरमधील सेना भवनात बेस्ट कर्मचारी सेनेचा मेळावा

    दादरमधील सेना भवनात बेस्ट कर्मचारी सेनेच्या सदस्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचारी सेना मुंबईत महत्वाची आहे. सचिन आहेर आणि अरविंद सावंत मेळाव्यात सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • 14 Nov 2025 05:09 PM (IST)

    बिहार निवडणुकीमध्ये जनतेने राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवली

    बिहार निवडणुकीचे कळ हाती आल्यानंतर शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश महस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  देशाच्या जनतेने बिहार निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवली. जनतेने काँग्रेसला झटकून टाकत हद्दपार केल्याचं नरेश महस्के म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. खोटी गैरसमज पसरवणे ,वोट चोरीचा मुद्दा तापवण्याचे आणि पसरवण्याचं काम ही मंडळी करत होती. मात्र बिहारची जनता सुज्ञ आहे. विकास आणि प्रगती याला मतदान झाल्याचंही म्हस्के म्हणाले.

  • 14 Nov 2025 05:03 PM (IST)

    मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग

    या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील मध्य रेल्वेवरील सर्वात महत्वाचं आणि गर्दीचं स्थानक असेलल्या सीएसएमटीबाहेर संशयित बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • 14 Nov 2025 04:52 PM (IST)

    Bihar Election Results 2025 : रक्षा खडसेंनी मानले बिहारच्या जनतेचे आभार

    बिहारच्या जनतेने नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत घवघवीत यश दिले, त्यामुळे बिहारच्या जनतेचे आम्ही आभार मानतो. हा कौल विकासाचा कौल आहे. अशी प्रतिक्रिया बिहार निवडणुकीवर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.

  • 14 Nov 2025 04:29 PM (IST)

    बिहार विधानसभा निवडणूक निकाल, नाना पटोले यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

    निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे. महाराष्ट्रामध्ये जो ट्रेंड होता. त्याच पद्धतीचा ट्रेंड बिहारमध्ये होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या मदतीने बिहारमध्ये एनडीए विजय झाली. निवडणूक आयोगाकडून दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून केल्या जातोय. बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचे मतदान करतानाचे फोटो दाखविल्या गेले. ते फोटो काँग्रेसनं निवडणूक आयोगाला दिलेले आहेत.  याचाच अर्थ दाल मे काला है, निवडणूक आयोग हे सर्व पाप करत आहे, हे यातून सिद्ध होत आहे, असं बिहार निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

  • 14 Nov 2025 04:10 PM (IST)

    बिहार निवडणूक निकालावर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

    लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातून बिहारमध्ये पोहोचली, दहा हजार रुपये त्या ठिकाणी महिलाांना देण्यात आले, त्यामुळे महिलांनी एनडीएला मतदान केलं.  हे जे मतदान मिळालं आहे हे मोदीजींच्या विकासावर आणि नितीशजींच्या कामावर मिळालेलं नसून, लाडक्या बहिणींना पैसे मिळाल्यानं हे मतदान या ठिकाणी त्यांना झालं, अशी प्रतिक्रिया यावेळी एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

     

     

  • 14 Nov 2025 03:50 PM (IST)

    राहुल गांधींची ‘घोड्याची गाडी’ पडली; सुलभा गायकवाडांचा खोचक टोला

    राहुल गांधींची ‘घोड्याची गाडी’ पडली, घोडे पळाले! असा खोचक टोला कल्याण पूर्व भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी लगावला आहे. भाजप नंबर 1… आणि नंबर 1च राहणार! असे देखील सुलभा गायकवाड यांनी बिहार निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर म्हटले आहे.

  • 14 Nov 2025 03:40 PM (IST)

    बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठा धक्का

    ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. दयानंद चोरगे मागील निवडणुकीमध्ये विधानसभेचे भिवंडीतील उमेदवार होते. चोरगे यांनी पत्रात जरी म्हटल असेल की माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देतोय मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज होते

  • 14 Nov 2025 03:25 PM (IST)

    नाचता येईना अंगण वाकडे; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

    नाचता येईना,अंगण वाकडे,अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांच्या बिहार विधानसभा निकालावर केलेल्या विधानावरून टीका केली आहे.तसेच संजय राऊतांनी आराम करावा,असा सल्ला देत,बिहार पेक्षा एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा निकाल असेल असा विश्वास देखील चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.

  • 14 Nov 2025 03:15 PM (IST)

    बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर बोरिवलीमध्ये जल्लोष

    बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर, आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली बोरिवलीमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. भाजप महिला कार्यकर्त्या ढोल-ताशांच्या तालावर नाचत आहेत आणि भाजपचा तिरंगा फडकवत आहेत.

  • 14 Nov 2025 03:01 PM (IST)

    बिहारमध्ये धक्कादायक निकाल, निकालानंतर मतमोजणीत घोळ होतोय यावर शिक्कामोर्तब – रोहित पवार

    बिहारमध्ये धक्कादायक निकाल,निकालानंतर मतमोजणीत घोळ होतोय यावर शिक्कामोर्तब – रोहित पवार

     

  • 14 Nov 2025 02:49 PM (IST)

    बिहारच्या जनतेचा कौल विकासाच्या बाजूने – विनोद तावडे

    बिहारच्या जनतेचा कौल विकासाच्या बाजूने आहे. मत चोरीला गेलं हे मतदारांना अजून पटलेलं नाही, विरोधकांनी व्होट चोरीचा चुकीचा मुद्दा हाती घेतला – विनोद तावडे

  • 14 Nov 2025 02:38 PM (IST)

    बिहारने जंगलराज नाकारलं, विकासराज स्वीकारलं – एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.

    बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, तसंच नीतिश कुमार यांनी केलेलं काम , त्यांनी बिहारमध्ये केलेला विकास यावरही जनेतेने विश्वास ठेवला, म्हणूनच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींचही मी अभिनंदन करतो, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  बिहारने जंगलराज नाकारलं, विकासराज स्वीकारलं असंही त्यांनी नमूद केलं.

  • 14 Nov 2025 02:32 PM (IST)

    महुआमधून तेजप्रताप यादव पिछाडीवर

    महुआमधून तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत, ते महुआमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत . महुआमध्ये एलजेपीचे संजय सिंह हे आघाडीवर असून सध्या इथे तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

  • 14 Nov 2025 02:29 PM (IST)

    अलीनगरमध्ये भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर

    अलीनगरमध्ये भाजपच्या मैथिली ठाकूर यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. 13 व्या फेरीत  त्या तब्बल 9 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • 14 Nov 2025 02:27 PM (IST)

    11 व्या फेरीनंतरही तेजस्वी यादव पिछाडीवर

    11 व्या फेरीनंतरही तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत. राघोपूर येथून तेजस्वी यादव 4829 मतांनी पिछाडीवर असून भाजपचे सतीश कुमार यांची विजयी आघाडी कायम आहे.

  • 14 Nov 2025 02:25 PM (IST)

    बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर बोरिवलीमध्ये आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष

    बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर, आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली बोरिवलीमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.  भाजप महिला कार्यकर्त्या ढोल-ताशांच्या तालावर नाचत आहेत आणि भाजपचा ध्वज फडकवत आहेत

  • 14 Nov 2025 02:24 PM (IST)

    बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्याने भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह यांचा धाराशिवमध्ये जल्लोष

    बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्याने धाराशिव येथे भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडले. तसेच  लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला.

  • 14 Nov 2025 01:35 PM (IST)

    Bihar Election Results 2025 : संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांनी मोठी प्रक्रिया दिली असून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

  • 14 Nov 2025 01:20 PM (IST)

    Bihar Election Results 2025 : जेडीयूचा अत्यंत मोठा दावा

    बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर जेडीयूचा दावा. नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असल्याचे स्पष्टपणे जेडीयूने म्हटले. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरीही नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील.

  • 14 Nov 2025 01:16 PM (IST)

    बिहारमध्ये कॉंग्रेससह आरजेडीचे पाणीपत

    बिहार निवडणुकीकडून भाजपासह आरजेडीला मोठी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात मोठा पराभव दोन्ही पक्षांना समारे जावे लागले.

  • 14 Nov 2025 01:13 PM (IST)

    बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा

    बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे आले असून बिहारामध्ये नरेंद्र मोदींचा करिश्मा बघायला मिळतोय.

  • 14 Nov 2025 01:12 PM (IST)

    Bihar Election Results 2025 : मैथिली ठाकूर 6206 मतांनी आघाडीवर

    मैथिली ठाकूर 6206 मतांनी आघाडीवर… अलीनगरमधून RJD चे विनोद मिश्रा पिछाडीवर… बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या नंबरवर जेडीयू…

  • 14 Nov 2025 01:01 PM (IST)

    Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या नंबरवर जेडीयू…

    बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या नंबरवर जेडीयू… एनडीएला प्रचंड बहुमत, महाआघाडी 50 च्या आत… बिहारमध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा…

  • 14 Nov 2025 12:40 PM (IST)

    – Bihar Election Results 2025 : आरजेडी कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त

    आरजेडी कार्यालयाबाहेर मोठी बंदोबस्त. कार्यकर्ते आक्रमक होऊ नये, याकरिता मोठा बंदोबस्त पोलिसांकडून ठेवण्यात आलाय. आरजेडी पक्षाला विधानसभेत अजिबात मुसंडी मारता आली नाही.

  • 14 Nov 2025 12:35 PM (IST)

    Bihar Election Results 2025 LIVE : एनडीएचा दणदणीत विजय

    कलांनुसार एनडीएचा दणदणीत विजय बिहारच्या निवडणुकीत झाल्याचे बघायला मिळतंय. कॉंग्रेसचा धुव्वा उडला आहे. राहुल गांधींची क्रेझ अजिबातच दिसली नाहीये.

  • 14 Nov 2025 12:26 PM (IST)

    Bihar Election Results 2025 LIVE : फडणवीसांची जादू बिहारमध्ये

    विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला होता. ते स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये होते. फडणवीसांनी ज्या ज्या विधानसभांमध्ये प्रचार केल, त्या विधानसभेतील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 14 Nov 2025 12:24 PM (IST)

    Vidhan Sabha Election Results 2025 : भाजपाच्या मैथिली ठाकूरांचा विजय निश्चित

    भाजपाच्या मैथिली ठाकूर यांचा विजय निश्चित असून सुरूवातीच्या फेरीपासून त्या आघाडीवर दिसत आहेत.

  • 14 Nov 2025 12:20 PM (IST)

    Bihar Assembly Election Results 2025 : लाडकी बहीण योजनेचा फायदा

    लाडकी बहिण योजनेचा फायदा एनडीएला झाल्याचे दिसतंय. स्पष्ट बहुमत मिळाले असून ध़डाकेबाज निकाल येताना दिसतोय.

  • 14 Nov 2025 12:19 PM (IST)

    Bihar Assembly Election Results 2025 : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत

    बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना सध्याच्या आकड्यांवरून दिसतंय.

  • 14 Nov 2025 12:12 PM (IST)

    Bihar Election Results 2025 : तेज प्रताप यादवांना मोठा झटका

    तेज प्रताप यादवांना मोठा झटका, पिछाडी कायम. भाजपा 87 जागांवर बिहारमध्ये आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 14 Nov 2025 12:09 PM (IST)

    Election Results 2025 : एनडीएची सत्ता बिहारमध्ये, मोठा विजय

    बिहारमध्ये मोठे यश एनडीएला मिळाल्याचे बघायला मिळतंय. एकहाती सत्ता एनडीएला मिळाली. भाजपा 87, जेडीयू 76, आरजेडी 36