AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar election: बिहारचा खरा निकाल अजून लागायचाय, 3 कोटी मतांची मोजणी बाकीच, अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर

अटीतटीची लढत सुरु असलेल्या सात जागांवर तर मतांचा फरक 200 पेक्षाही कमी आहे. | Bihar election results 2020

Bihar election: बिहारचा खरा निकाल अजून लागायचाय, 3 कोटी मतांची मोजणी बाकीच, अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 10, 2020 | 2:02 PM
Share

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संथ वेगामुळे प्रत्यक्ष निकाल स्पष्ट होण्यास आणखी सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या जवळपास 30 हजारांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत साधारण 20 टक्केच मतांची मोजणी होऊ शकली होती. अद्याप 3 कोटी मतांची मोजणी बाकी असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. (Bihar Election vote counting will continue till evening)

दुपारी एक वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बिहारमधील 166 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये फक्त 5000 मतांचा फरक आहे. तर 80 जागांवर हा फरक 2000 मतांपेक्षाही कमी आहे. 49 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये 1000 मतांचा फरक आहे. तर 500 पेक्षा कमी मतांचा फरक असलेल्या मतदारासंघाची संख्या 20 इतकी आहे. एवढेच नव्हे तर अटीतटीची लढत सुरु असलेल्या सात जागांवर तर मतांचा फरक 200 पेक्षाही कमी आहे. त्यामुळे आगामी काही तासांत संपूर्ण चित्र पालटूही शकते.

एरवी बिहारमध्ये 73 हजार मतदान केंद्रे असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक मतदान केंद्रांवरील मतमोजणी करायची आहे. या केंद्रांवर मतमोजणीच्या कमीतकमी 23 ते जास्तीत जास्त 51 फेऱ्या पार पडू शकतात. त्यामुळे मतमोजणीला आणखी वेळ लागेल, अशी माहिती एच.आर. श्रीनिवासन यांनी दिली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या दोन तासांत हे चित्र संपूर्णपणे पालटले असून आता भाजपप्रणित आघाडीने भक्कम आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास 127 तर महागठबंधन 104 जागांवर आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या:

Bihar election results 2020: ‘अनेक जागांवर 500 -1000 मतांचाच फरक, निवडणुकीचे चित्र पुन्हा पालटू शकते’

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय

Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

(Bihar Election vote counting will continue till evening)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या