AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल, नितीश कुमार यांच्या जागी या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड

Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आहे. महत्वाचं म्हणजे जो नेता मुख्यमंत्री बनणार आहे, त्याचे वडिल कधीकाळी लालूप्रसाद यादव यांचे खास होते.

Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल, नितीश कुमार यांच्या जागी या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड
Nitish Kumar
| Updated on: Apr 14, 2026 | 12:52 PM
Share

बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आहे. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. ते बिहार भाजपमधील मोठे नेते आहेत. सम्राट चौधरी यांचं नावं बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालं आहे. नितीश कुमार यांचे सुपूत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री बनू शकतात. उद्या 15 एप्रिलला 11 वाजता लोकभवनात शपथ ग्रहण समारंभ होणार आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. बिहार राज्यपालांच्या सचिवाने सोमवारी सम्राट चौधरी यांची भेट घेतली होती. लोकभवनात होणाऱ्या शपथ ग्रहण समारंभासंबंधी ही भेट झाली होती.

शपथविधी सोहळ्यात कोण-कोण बड्या आसामी सहभागी होणार, याची पूर्ण माहिती घेतली. संभाव्य मंत्र्यांच्या लिस्टबद्दल सम्राट चौधरी यांनी राज्यपालांच्या सचिवांशी चर्चा केली. नितीश कुमार राज्यसभेवर गेल्याने बिहारचं मुख्यमंत्रीपद रिक्त झालं आहे. सीएमच्या खुर्चीवर कोण बसणार? याविषयी दीर्घकाळापासून चर्चा सुरु होती. अनेक नावं आली, पण मोहोर सम्राट चौधरी यांच्या नावावर लागली. विजय चौधरी यांचं उपमुख्यमंत्रीपद जवळपास निश्चित आहे.

वडिल कधीकाळी लालू प्रसाद यादव यांचे खास

16 नोव्हेंबर 1968 रोजी सम्राट चौधरी यांचा जन्म झाला. ममता कुमार यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांच्या वडिलांचं नाव शकुनी चौधरी. आईचं नाव पार्वती देवी. सम्राट चौधरी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांचे वडिल शकुनी चौधरी यांचा समावेश समाजवादी नेत्यांमध्ये व्हायचा. शकुनी चौधरी कधीकाळी लालू प्रसाद यादव यांचे खास होते. त्यानंतर शकुनी चौधरी यांनी आपली राजकीय दिशा बदलली. ते नितीश कुमार यांच्यासोबत गेले.

त्यांच्याच शाळेत राजकारणाचे धडे गिरवलेत

सम्राट चौधरी यांना राजकारण वारशामध्ये मिळालं आहे. त्यांचे वडिल शकुनी चौधरी यांचा गणती राज्यातील मोठ्या नेत्यांमध्ये होते. सम्राट चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या सानिध्यातच राजकारणाचे धडे गिरवले. गमतीची बाब म्हणजे सम्राट चौधरी ज्या लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, आरजेडी यांचा विरोध करतात, त्यांच्याच शाळेत सम्राट चौधरी यांनी राजकारणाचे धडे गिरवलेत. त्यांनी आरजेडीमधूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली आहे.

Follow Us
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...