Election Result 2026 : आलू पुरी ते रसगुल्ला… काऊंटिंगदरम्यान BJP मुख्यालयात जोरदार तय्यारी

Election Results 2026 : विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू होताच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मुख्यालयात जोरदार तय्यारीला उधाण आलं. खाण्या-पिण्याची तयारी खास 22 लोकांची टीम सांभाळत आहे.

Election Result 2026 : आलू पुरी ते रसगुल्ला...  काऊंटिंगदरम्यान BJP मुख्यालयात जोरदार तय्यारी
| Updated on: May 04, 2026 | 12:28 PM

Election Results 2026 : आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी सुरू असून या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पश्चिम बंगाल मध्ये मोठा उलटफेर होताना दिसत असून त्याकडे अख्खा देशाच्या नजरा लागल्या आहेत. 4 मे , सोमवारी सकाळपासून विधानसभा निवडमुकांच्या मतमोजणीला सुरूवात होताच, राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मुख्यालयात जोरदार तयारी सरू झाली. भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण असून बीजेपी मुख्यालयात पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी पारंपरिक पुऱ्या आणि मिठाई तयार केली जात आहे. याशिवाय, पाच राज्यांमधील सात विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील आज सुरू असून, भाजपने दमदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक पदार्थ तयार करण्यात येत आहे. यासंदर्भात शेफने न्यूज एज्नसी ANI शी बातचीत करत मोठ्या तयारीचा आढावा घेतला. “आम्ही पहाटे 4 वाजल्यापासूनच तयारी करत आहोत. सुमारे 400 ते 500 लोकांसाठी खास जेवण बनवले जात आहे. नाश्त्यामध्ये सँडविच, आलू-पुरी, पोहे आणि जिलेबी यांसारख्या विविध पदार्थांचा समावेश आहे. ताजी फळे, लस्सी, रबडी आणि पारंपरिक गोड पदार्थ दही हेदेखील तयार करण्यात आले आहे” असं शेफने सांगितलं.

“जेवणात डाळ तडका, कढी पकोडा, परवळ-आलू, भात आणि पापड यांचा समावेश आहे” असं दुपारच्या जेवणाबद्दलही शेफनी सांगितलं. या विशेष वातावरणात भर घालण्यासाठी, रसगुल्ला आणि जिलेबी यांसारख्या खास बंगाली मिठाईसुद्धा तयार केल्या जात आहेत, ज्या दिवसभरात 400-500 लोकांना दिल्या जातील. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी 22 लोकांची टीम कार्यरत असल्याचे शेफने नमूद केलं.

 

काउंटिंग सुरू

दरम्यान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासह 823 मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीची सुरुवात टपाल मतपत्रिकांनी झाली, त्यानंतर सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक फेरीचे निकाल ईसीआयनेट प्लॅटफॉर्मवर आणि निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर रिअल-टाइममध्ये अपडेट केले जात आहेत. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Follow Us