AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून भाजपला इंधानाचे दर कमी करावे लागले- पी चिदंबरम

लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांनी, "मोदी सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्याचे नाटक केले आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर (UP Elections) पेट्रोलियमच्या किमती पुन्हा वाढवल्या जातील", असा आरोप त्यांनी केला.

...म्हणून भाजपला इंधानाचे दर कमी करावे लागले- पी चिदंबरम
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 04, 2021 | 6:18 PM
Share

नवी दिल्लीः केंद्राने बुधवारी घोषणा केली की 4 नोव्हेंबरपासून पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलसाठी 10 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी होईल. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं केंद्र सरकारने सांगितलं. मात्र विरोधक भाजप सरकारवरने हा निर्णय फक्त आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे, अशी टीका करतायेत. (BJP decreased petrol diesel prices because of elections loss said P Chidambaram Congress)

काँग्रेस खासदार पी चिदंबरम म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या तीन लोकसभा आणि 30 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आला. इंधनावरील उच्च कर हा केंद्र सरकारचा लोभ आहे,’ असे त्यांनी लिहिले. तर काँग्रेस आणि भाजप पक्षांमधील मतांची तफावतही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

“उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर दर पुन्हा वाढवणार”

तर दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते लालू प्रसाद यादव यांनी, “मोदी सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्याचे नाटक केले आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोलियमच्या किमती पुन्हा वाढवल्या जातील”, असा आरोप त्यांनी केला. “केंद्राने जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने लोकांना खरा दिलासा मिळणार नाही. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली कपात अपुरी आहे. जर किमती 50 रुपये प्रति लिटरने कमी केल्या तर दिलासा मिळाला असता”, असं लालू प्रसाद म्हणाले.

आरजेडीचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, पेट्रोलचे दर 70 रुपयांच्या खाली आणले पाहिजेत. ते म्हणाले, “आधी, भाजपला पेट्रोल प्रति लिटर 70 रुपये महाग देत होते आणि आता त्यांनी 100 रुपयांच्या वर भाव वाढवले आहेत. त्यांनी पेट्रोलचे दर किमान 70 रुपयांच्या खाली आणले पाहिजेत,” असे ते म्हणाले.

योगींने पंतप्रधानांचे मानले आभार

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि ही दिवाळीची भेट असल्याचे म्हटले. “डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचे आभारी आहोत. जेव्हा लोकांच्या जीवनात महागाई येते तेव्हा डिझेल आणि पेट्रोलचा त्यात हातभार लागतो. हा मोठा दिलासा आहे. या निमित्ताने पंतप्रधानांची ही दिवाळीची भेट आहे,” आदित्यनाथ यांनी आज पत्रकारांना सांगितले.

Related News

‘केंद्र सरकार आणि मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

VIDEO: पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय?; राऊतांचा सवाल

MLA Shweta Mahale Agitation : बळीराजासाठी भाजपची राज्यभर काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंनी बेसन-भाकरी खाऊन नोंदवला निषेध

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक