‘केंद्र सरकार आणि मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

पंढरपूर, जिल्हा परिषदेत ते पराभूत झाले. महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत आणि तुम्ही निद्रिस्त आहात. मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या नंबरवर जातोय. राज्यात शेतकरी, एसटी कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, तरी तुम्ही निद्रिस्त आहात. जागे व्हा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, अशी खोचक टीका दरेकर यांनी केलीय.

'केंद्र सरकार आणि मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय', प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा
प्रवीण दरेकर, संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 5:08 PM

मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सरकारमध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं काल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. पेट्रोल-डिझेलच्या किमती 100 रुपयांनी वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल यांनी केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Praveen Darekar reply to Sanjay Raut’s criticism on Narendra Modi Government over fuel price hike)

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय. किमान कौतुकाची अपेक्षा होती पण त्यांनी टीका केली. पराभव झाला म्हणून सरकारला जाग आली, असं राऊत म्हणाले. पण पंढरपूर, जिल्हा परिषदेत ते पराभूत झाले. महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत आणि तुम्ही निद्रिस्त आहात. मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या नंबरवर जातोय. राज्यात शेतकरी, एसटी कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, तरी तुम्ही निद्रिस्त आहात. जागे व्हा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, अशी खोचक टीका दरेकर यांनी केलीय.

संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. संपूर्ण देशात पोटनिवडणुकात हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल? की पूर्णपणे पराभूत करावे लागेल? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल का? असा संतप्त सवाल करतानाच 2024 नंतर हे दिवस येतील असं वाटतं, असं राऊत म्हणाले.

’50 रुपयांनी दरवाढ कमी करा!’

केंद्र सरकारने अत्यंत किरकोळ दरवाढ कमी केली आहे. ही एक प्रकारे नागरिकांची चेष्टाच आहे. या सरकारकडे मोठं मन नाही. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार? असा सवाल करतानाच पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. नंतर 50 रुपये कमी करायला हवे होते. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?, असा सवाल राऊत यांनी केला.

इतर बातम्या :

Video : कमी सुरक्षा आणि विना VVIP ट्रिटमेंट निघाला पंतप्रधान मोदींचा ताफा, सामान्य नागरिकांना त्रास नाही!; सोशल मीडियावर कौतुक

‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा

Praveen Darekar reply to Sanjay Raut’s criticism on Narendra Modi Government over fuel price hike

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.