AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमिशनरचे पद सोडले, भाजपात प्रवेश, दोन दिवसात IAS ला मिळाले लोकसभा पोटनिवडणूकीचे तिकीट

अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला आहे. तसेच आता IAS अधिकारी देबाशीष शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांना लगेच लोकसभेचे तिकीटही मिळाले आहे.

कमिशनरचे पद सोडले, भाजपात प्रवेश, दोन दिवसात IAS ला मिळाले लोकसभा पोटनिवडणूकीचे तिकीट
bjp flag
| Updated on: Sep 11, 2026 | 7:53 PM
Share

भाजपाने शुक्रवारी आसामच्या नगांव लोकसभा जागेच्या पोट निवडणूकीसाठी माजी IAS अधिकारी देबाशीष शर्मा यांना आपला उमेदवार म्हणून घोषीत केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. आणि ९ ऑक्टोबरला मतमोजणी आहे. खास बाब म्हणजे देबाशीष शर्मा यांनी ३ सप्टेंबर रोजी आपली नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. याआधी ते नगांवचे जिल्हा आयुक्त होते. परंतू ३ सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आणि ८ सप्टेंबर रोजी भाजपात ते सामील झाले होते. आणि पक्षात सामील होण्याच्या दोन दिवसात आतच त्यांना नगांवमधून तिकीट मिळाले.

Debashish Sharma

Debashish Sharma

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर प्रद्युत बोरदोलोई यांनी येथून विजय मिळवला होता. परंतू त्यानंतर ते भाजपात सामील झाले होते. आणि विधानसभा निवडणूकीत दिसपूरमधून विजय मिळवला होता. ज्यामुळे नगांव सीटवर आता पोट निवडणूक होत आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसैन यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्या जवळ तक्रार नोंदवली होती. त्यांनी नगांवच्या जिल्हा आयुक्त म्हणून शर्मा यांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांची चौकशी करण्याची आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन

देबाशीष शर्मा यांनी इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन आणि पब्लिक रिलेशन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. १९९२ मध्ये आसामच्या सिव्हील सर्व्हीस मध्ये ते सामील झाले. त्यांची पहिली पोस्टींग बारपेटा येथे झाली होती.

याआधी विविध पदावर काम

त्यांनी आसामचे तत्कालिन गव्हर्नर लेफ्टनंट जनरल एस.के. सिन्हा यांचे स्पेशल ऑफीसर आणि मुंबईतील आसाम भवन डेप्युटी रेसिडेंट कमिश्नर म्हणून देखील काम केले आहे. नगांव येथे नियुक्ती होण्याआधी देबाशीष शर्मा यांनी गुवाहाटी पालिकेचे आयुक्त आणि मोरीगाव जिल्ह्याचे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. आणि नगांवमध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शर्मा कँसर केअर ऑर्गनायझेशन ‘दीपशिखा’च्या फाऊडिंग चेअरमन आणि ट्रस्टी देखील आहेत.

Follow Us
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?