AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेलंगणातील हुकुमशाही सरकार पायउतार होणं निश्चित’, भाजप महासचिवांचा घणाघात

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावेळी तरुण चुग यांनी तेलंगणा राष्ट्र समिती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तेलंगणातील TRSचं हुकुमशाही सरकार पायउतार होणं निश्चित आहे. TRS ची लंका उद्ध्वस्त होणार, असा घणाघात करत चुग यांनी भाजपचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.

'तेलंगणातील हुकुमशाही सरकार पायउतार होणं निश्चित', भाजप महासचिवांचा घणाघात
तरुण चुग, भाजप, महासचिव
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 11:49 PM
Share

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग दोन दिवस तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावेळी तरुण चुग यांनी तेलंगणा राष्ट्र समिती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तेलंगणातील TRSचं हुकुमशाही सरकार पायउतार होणं निश्चित आहे. TRS ची लंका उद्ध्वस्त होणार, असा घणाघात करत चुग यांनी भाजपचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. (BJP leader aggressive against Telangana Rashtra Samiti government)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 17 सप्टेंबर रोजी निर्मल जिल्ह्यातील एका विशाल रॅलीला संबोधित करतील. या पार्श्वभूमीवर तरुण चुग यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल. तसंच टीआरएस सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘टीव्ही 9 सोबत बातचित करताना तरुण चुग म्हणाले की, पदयात्रेत मिळालेलं समर्थन पाहून बंडी संजय यांच्या नेतृत्वात सुरु असलेली प्रजा संग्राम यात्रा तेलंगणातील परिवर्तना मार्ग निश्चित करेल’, असा विश्वास चुग यांनी यावेळी व्यक्त केलाय.

17 सप्टेंबरला नवं रेकॉर्ड बनेल- चुग

17 सप्टेंबर रोजी एक विशाल सभा होणार आहे. ती सभा हुकुमशाही, परिवारवादाच्या सरकारसह निजामशाही आणि निजामवादाला तिलांजली देणारी आहे. टीआरएस सरकारचं जाणं निश्चित आहे. 17 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तेलंगणातील सर्वात मोठी रॅली होईल. पक्षाचे सर्व नेते एकत्र येत शाहांची यात्रा आणि सभेच्या कामात गुंतले आहेत. आपण एक नवा रेकॉर्ड बनवायला जात आहोत, असा दावा चुग यांनी यावेळी केलाय.

17 सप्टेंबरची सभा म्हणजे तेलंगणा सरकार पायउतार होण्याचा शंखनाद असेल. हा शंखनाद करण्यासाठी स्वत: अमित शाह येत आहेत. त्यांच्या शंखनादानंतर तेलंगणातील ही परिवारवाद, भ्रष्टाचार, वंशवाद, लूटमार करणारं सरकार जाईल. टीआरएसची लंका आता नष्ट होणार आहे, असा घणाघात चुग यांनी केला आहे.

निर्मल चुग यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत

भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग दिल्लीवरुन विमानाने हैदाराबादेत पोहोचले. त्यानंतर ते रस्ते मार्गानं निर्मलमध्ये पोहोचले. तिथे पक्ष कार्यकर्त्यांनी चुग यांचं जंगी स्वागत केलं. चुग यांनी रात्रीचा मुक्काम चुगमध्येच केला. त्यानंतर त्यांनी शनिवारी अमित शाह यांच्या होणाऱ्या रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला. चुग आज रात्री दिल्लीला परतणार आहेत.

इतर बातम्या :

मुंबईतलं निर्भया बलात्कार कांड, मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना 5 मोठ्या सुचना, वाचा सविस्तर

‘भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही’, एका मंत्र्याबाबत चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा

BJP leader aggressive against Telangana Rashtra Samiti government

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.