AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा (shoot at sight order by telangana chief minister) केली.

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा
| Edited By: | Updated on: Mar 25, 2020 | 12:01 PM
Share

हैद्राबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा (shoot at sight order by telangana chief minister) केली. या घोषणेनंतर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तेलंगणा सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. “नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ”, असा कठोर इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (shoot at sight order by telangana chief minister) यांनी दिला.

“लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. लष्कर बोलावून संचारबंदी लावण्यात येईल”, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे.

“राज्यातील नागरिकांनी राज्याबाहेर जाऊ नये. तसेच कुणीही रस्त्यावर उतरु नका. कुणाला काही अडचण असेल तर 100 नंबरवर कॉल करा. पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला मदत करतील. नागरिकांनी राज्य सरकारला सहकार्य करा. जर कुणी सूचनांचे पालन केले नाही तर सैन्याला बोलावून गोळी मारण्याचे आदेश आम्हाला द्यावे लागतील”, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

“परदेशातून परतल्यानंतर ज्यांना क्वारंटाईन करण्यास सांगितले असून जे क्वारंटाईन झाले नाहीत, अशा लोकांचे पासपोर्ट जप्त करा. राज्यात 36 कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या आहे. तर 19313 लोकांवर सरकारची नजर आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांची संख्या देशात 10 झाली आहे. तर राज्यात एकूण 500 च्या वर लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परदेशातील आलेल्या अनेक नागरिकांना क्वारंटाईन करुन त्यांच्यावर सरकारची नजर आहे.

संबंधित बातम्या :

नेहमी रात्री आठ वाजताच बोलून चार तास देतात, अनुराग कश्यपचा मोदींना टोला

कोरोना रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन कसा महत्त्वाचा ठरणार?

अन्नधान्य, पोलीस ते दुधाची गाडी, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक सुविधा बंद होणार नाहीत : उद्धव ठाकरे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.