BJP : केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घराला अचानक लागली आग, अफरातफरी, गोंधळ
BJP : फायर ब्रिगेडचे तीन फायर टेंडर्स घटनास्थळी पोहोचले. 8.30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग का लागली? त्या मागच्या कारणांचा तपास केला जातोय.

भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील घराला आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली. घरातील एका खोलीतील बेडमध्ये आग लागली. आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडला देण्यात आली. फायर ब्रिगेडचे तीन फायर टेंडर्स घटनास्थळी पोहोचले. 8.30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग का लागली? त्या मागच्या कारणांचा तपास केला जातोय. दिल्लीत मदर क्रेसेंट रोडवर रविशंकर प्रसाद यांचं घर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळी फायरब्रिगेडचे अधिकारी पोहोचले असून आग लागण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविशंकर प्रसाद यांचं घर दिल्लीत खास मानल्या जाणाऱ्या लुटियंस झोनच्या मदर टेरेसा क्रिसेंट रोडवर आहे. आज सकाळी त्यांच्या घरातील एका खोलीतील बेडमध्ये आग लागण्याची घटना घडली. आगीच्या ज्वाळा दिसताच लगेच फायरब्रिगेडला सूचित करण्यात आलं.
तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या
फायर ब्रिगेडला माहिची मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. काहीवेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन विभाग आणि पोलिसांची टीम आगीच्या कारणांची चौकशी करत आहे.
