‘हा तर क्रूर विनोद’ नवीन शिक्षणमंत्र्यांची उडवली खिल्ली, बड्या भाजप नेत्याची मुलगी CJP समर्थनार्थ थेट मैदानात
Yashaswinee Raje Singh attack on Pralhad Joshi: सत्ताधारी CJP आंदोलनाविरोधात वक्तव्य करत असतानाच भाजपच्या बड्या नेत्यांची मुलं मात्र पक्षाविरोधी भूमिका बजावताना दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या मुलांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला थेट पाठिंबा देण्याचा धडका लावल्याचे दिसते. त्यात अजून एक नाव जोडल्या गेले आहे. सरकारला घरचा आहेर मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) जंतर मंतरवरील आंदोलनाने देश ढवळून काढला. भाजप आणि समविचारी पक्षांनी आंदोलनावर चिखलफेक केली. आंदोलन राष्ट्रविरोधी असल्याचा सूर आळवला. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. पण काही भाजप नेत्यांच्या मुलांनी CJP आंदोलनाला पाठिंबा देण्याचा सपाटा लावला आहे. भाजप नेत्यांच्या कुटुंबियांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला उघड पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये अजून एक नाव जोडल्या गेले आहे. यशस्विनी राजे सिंह यांचे नाव चर्चेत आले आहे. यशस्विनी ही प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आहे. तिचे वडील भाजपचे बडे नेते आहेत. तिने विद्यार्थी आंदोलनावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सीजेपी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर धर्मेंद्र प्रधान यांच्या ऐवजी प्रह्लाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा तर क्रूर विनोद, क्रूर थट्टा असल्याचा सणसणीत टोला तिने लगावला आहे.
हा तर क्रूर विनोद
यशस्विनी ही उत्तर प्रदेशातील माजी भाजपा आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आहे. ती स्वतः दिल्ली येथील जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाली होती. तिने अल जजीरा या वाहिनीला मुलाखत दिली. त्यात प्रह्लाद जोशी यांच्या खांद्यावर शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यावर तिने तिखट प्रतिक्रिया दिली. तिने या नियुक्तीवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. जोशींची नियुक्ती ही तर अत्यंत क्रूर थट्टा असल्याची जहरी टोला तिने लगावला.
धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार हल्ला
नीट परीक्षेतील गलथान कारभाराविरोधात पेपरफुटीविरोधात जेन झी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 20 जून रोजी विद्यार्थी आंदोलनात उतरले. हे आंदोलन 36 दिवस चालले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर पोलिसांनी लाठाहल्लाच झाला नाही तर पेनेट गनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले. अनेक राज्यात विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. 25 जुलै रोजी अखेर सरकार झुकले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यावर यशस्विनी राजे सिंह हिने प्रधान यांच्या वागणुकीवर सडकून टीका केली.
राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी जी भाषा वापरली, त्यातून त्यांना आंदोलनाची, नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या. पेपरफुटी झाली याचा कुठलाही पश्चाताप झाल्याचे दिसून आले नसल्याची टीका यशस्विनी हिने केले. यशस्विनीने सीजेपी आंदोलनाला थेट पाठिंबा दिला. तिने आंदोलनाचे कौतुक केले. इतकेच नाही तर जंतर मंतरवरील आंदोलनात ती सहभागी झाली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच तिने प्रह्लाद जोशींच्या नियुक्तीवर तोंडसुख घेतले आहे.