ऐकावं ते नवलचं! भाजप आमदार स्वपक्षाच्या खासदाराविरोधात 101 तासांचा उपवास धरणार

ऐकावं ते नवलचं! भाजप आमदार स्वपक्षाच्या खासदाराविरोधात 101 तासांचा उपवास धरणार
आगामी निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. अशात भाजपने पक्षातील अनुभवी आणि विश्वासपात्र नेत्यांकडे जबाबदारी देण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह त्यांच्या पक्षाचे खासदार विरेंद्र सिंह मस्त याच्या विरोधात मैदानात उतरले आहेत Surendra Singh Virendra Singh

Yuvraj Jadhav

|

Jan 27, 2021 | 4:45 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह त्यांच्या पक्षाचे खासदार विरेंद्र सिंह मस्त याच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. विरेंद्र सिंह भूमाफिया असल्याचा आरोप सुरेंद्र सिंह यांनी केला आहे. ते आता विरेंद्र सिंह मस्त आणि बालियाचे जिल्हाधिकारी यांना चांगला विचार करता यावा यासाठी 101 तासांचा उपवास धरणार आहेत. सुरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी एच.पी. सिंह यांच्यावर खासदारांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केला आहे. (BJP MLA Surendra Singh will go on fast against BJP MP Virendra Singh Mast)

बालियामधील बैरियामधील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत खासदार विरेंद्र सिंह मस्त यांच्यावर आरोप केले. विरेंद्र सिंह मस्त हे भूमाफिया असल्याचा आरोप केला. खासदारांनी त्यांचा मुलगा, भाऊ आणि भाच्याच्या नावावर बैरियामध्ये शिवपूर गावातील विजय बहादूर सिंह यांची 18 एकर जमीन फसवणूक करुन बळकावली होती. सुरेंद्र सिंह यांनी उपवासाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटले. ते खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सदबुद्धी मिळण्यासाठी 101 तासांचा उपवास करणार आहेत.

विरेंद्र सिंह मस्त काय म्हणाले?

भाजपा खासदार विरेंद्र सिंह यांनी आमदार सुरेंद्र सिंह यांच्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक खासदार म्हणून माझी ओळख आहे. मात्र, मी शांत आहे याला माझी कमजोरी समजू नका, असं विरेंद्र सिंह यांनी ठणकावलं आहे. ‘समाजात द्वेष पसरवून कोणी समाजाचं भलं करु शकत नाही. मी बोलत नाही याचा अर्थ मी घाबरतो किंवा कमजोर आहे, असं समजू नका, असा इशारा विरेंद्र सिंह मस्त यांनी दिला.

सुरेंद्र सिंह यांच्या आरोपावर भाजप खासदार मस्त यांचे खासगी सचिव अमन सिंह यांनी भाजप आमदारांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा दावा केलाय. माध्यमांसमोर आरोप करण्यापेक्षा आमदारांनी कायदेशीर लढाई लढावी,असं आवाहन अमन सिंह यांन केलेय. जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित बातम्या:

Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात

मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश

(BJP MLA Surendra Singh will go on fast against BJP MP Virendra Singh Mast)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें