AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर भाजप खासदार भडकले

E20 Petrol : इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर मध्य प्रदेशातील रिवा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा भडकले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

'शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर भाजप खासदार भडकले
E20 Petrol and BJP Janardhan MishraImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 09, 2026 | 9:43 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून वाद सुरू आहे. काही वाहन चालकांनी E20 पेट्रोल वाहनांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे. तर सरकारने हा दावा फेटाळला आहे. मात्र देशात विविध ठिकाणी या इंधनाला विरोध केला जात आहे. अशातच आता इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर मध्य प्रदेशातील रिवा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा भडकले आहे. त्यांनी एक आक्षेपार्ह विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मध्य प्रदेशातील रिवाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रीत इंधनावर बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. मिश्रा यांनी म्हटले की, ‘युद्ध सुरू आहे आणि होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध आहेत, असे असतानाही काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करत आहेत. देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नसताना ते कुठून आणणार, असा सवाल करत त्यांनी संतापाच्या भरात ‘तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ अशा शब्दांचा वापर केला. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर मिश्रा भडकले

रविवारी रिवा विमानतळावर दोन नवीन विमानसेवांच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांसह आमदार आणि अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मंचावरून संबोधित करताना खासदार जनार्दन मिश्रा यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराला विरोध करणाऱ्यांना सुनावलं आहे. काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करत शुद्ध पेट्रोलची मागणी करत आहेत. यावर बोलताना मिश्रा यांनी म्हटले की, ‘शुद्ध पेट्रोल कुठून येणार, तुमच्या बापाच्या घरून येणार का?’

राजकीय चर्चेला उधाण

खासदार जनार्दन मिश्रा यांच्या या वक्तव्यानंतर आता हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे, मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असतानाच हे वक्तव्य करण्यात आले. खासदारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, राजकीय वर्तुळातही यावर चर्चा सुरू झाली आहे. रिवा विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा