जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेच्या बाहेर गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, भाजप खासदाराचं PM मोदींचा उल्लेख करत सचूक वक्तव्य

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून वातावरण तापलं आहे. या वादाचे पडसाद संसदेतही उमटू लागले आहेत.

जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेच्या बाहेर गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, भाजप खासदाराचं PM मोदींचा उल्लेख करत सचूक वक्तव्य
| Updated on: Jul 23, 2026 | 11:59 AM

नीट पेपरफुटी प्रकरण आणि कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. जंतर-मंतरच्या आंदोलनाचे संसदेतही पडसाद उमटत आहे. ‘नीट’च्या मुद्द्यावर संसदेच्या सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर सत्ताधारी ‘नीट’च्या मुद्यावर बोलण्यास तयार आहे, परंतु काँग्रेस बोलण्यास तयार नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या आंदोलनाच्या आडून काँग्रेस राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी या प्रकरणाचा कोर्टात तोडगा काढला जाईल. या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक कारवाई केली जाईल, असं भाजप खासदार पात्रा यांनी म्हटलं आहे.

भाजप खासदार संबित पात्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार पात्रा म्हणाले, ‘तुम्ही संसदेबाहेरील काँग्रेसची वर्तवणूक पाहू शकतात. काँग्रेसचे खासदार संसदेतही अशीच वर्तणूक करत असते. सदनच्या आत देखील काळे कपडे घालून बॅनर-पोस्टर घेऊन वेळ वाया घालवते. ज्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, त्यावर काँग्रेस पळ काढते. तुम्ही पाहू शकता. येत्या दोन दिवसांपासून असा प्रकार सुरू आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन, जे. पी. नड्डा यांनी विद्यार्थी आणि सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधला आहे. त्यातून एकच बाब समोर आली आहे की, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे. सदनाच्या पटलावर कडक कायदे तयार झाले पाहिजे.

‘वर्षानुवर्षे पेपर लीक होतात. विद्यार्थ्यांच्या त्याचा समस्या सामना करावा लागतो. त्यासाठी कायदे झाले पाहिजे. परंतु काँग्रेसला संसदेत चर्चा नकोय, त्यांना राजकारण करायचं आहे. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, मुले कोणत्याही पक्षाचे नसतात. मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफ केले जाणार आहे. आज मोदींनी एक मोठी घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात हाताळले जाणार आहे. पेपरफुटीतील आरोपींवर त्वरित कारवाई केली जाईल. नितीन नबीन यांनी विरोधकांना चर्चा करण्यास आमंत्रण दिलं. विद्यार्थी कोणत्याही पक्षाचे नसतात. विद्यार्थी भारताचे असतात. आमच्या घरातही विद्यार्थी आहे. त्यांच्यावर कधीही अन्याय होणार नाही. पंतप्रधान मोदींनीही चर्चा करण्यास सांगितलं आहे’, असे त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us