भाजप श्रेष्ठी बसवराज बोम्मई यांची उचलबांगडी करणार? काय आहे कारण वाचा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांची बैठक घेऊन कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशानंतर बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य कायम ठेवले.

भाजप श्रेष्ठी बसवराज बोम्मई यांची उचलबांगडी करणार? काय आहे कारण वाचा
भाजपच्या बैठकीत नरेंद्र मोदी व जे.पी.नड्डाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 3:26 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (bjp national council )राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक १६ जानेवारीपासून दिल्लीत सुरु झाली आहे. तीन दिवसांच्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यांसंदर्भात चर्चा होत आहे. याच वेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. यामुळे कर्नाटकात भाजप श्रेष्ठी मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बोम्मई यांच्या संदर्भात महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप श्रेष्ठींशी चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांची बैठक घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादासंदर्भात कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशानंतर बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य कायम ठेवले.

गुजरातची चर्चा भाजप कार्यकारणीच्या बैठकीत सर्वाधिक चर्चा गुजरात निवडणुकीची झाली. या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. गुजरातचा फार्मूला कर्नाटकमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे येडियुरप्पा यांचे पक्षातील महत्त्व वाढत आहे. ते पक्षाच्या संसदीय मंडळावरही आहेत. लिंगायत समाजाचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे. कर्नाटकात पक्ष पुन्हा येडियुरप्पा यांना आपला चेहरा बनवू शकतो. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्रासोबतच्या सीमावादात अडकले आहेत. त्याचा निरोप घेतला जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

२०१८ च्या निवडणुकीत गुजरात भाजपच्या हातातून निसटण्यापासून वाचला. पक्षाला १८२ पैकी केवळ १०१ जागा मिळाल्या. २०२२ मध्ये असे होऊ नये म्हणून गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांनी राज्यात रॅली काढणे सुरूच ठेवले. निवडणुकीच्या २० दिवस आधी १५० हून अधिक जाहीर सभा झाल्या. त्यापैकी ३५ हून अधिक पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे होते.

मंगळवारी काय झाले बैठकीत निवडणुकीतील राज्यांच्या नेतृत्वाचीही चाचपणी मंगळवारी होणार आहे. त्यांना त्यांच्या विजयाचा रोडमॅप आणि त्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे हे सांगावे लागेल. पहिल्या दिवशीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांचा भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधातील नकारात्मक प्रचार आणि असभ्य भाषेचा वापर.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.