Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकारमध्ये फेरबदल होणार, दोन केंद्रीय मंत्री राजीनामा देणार? नव्याने कोणाोची वर्णी लागणार?

मोदी सरकारमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. तर दोन केंद्रीय मंत्री राजीनामा देण्याची चर्चा रंगली आहे. नेमके काय फेरबदल होणार, जाणून घ्या.

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकारमध्ये फेरबदल होणार, दोन केंद्रीय मंत्री राजीनामा देणार? नव्याने कोणाोची वर्णी लागणार?
modi cabinet
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 7:08 PM

उत्तर प्रदेशच्या राज्यसभेतील 10 जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत सर्व नव्या चेहऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यात केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि बीएल वर्मा यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. यामुळे आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे दोन केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

हरदीप सिंह पुरी हे सध्या सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री आहेत. तर बीएल वर्मा हे राज्यमंत्री आहेत. दोन्ही खासदार राज्यसभा सदस्य आहेत. दोन्ही नेत्यांचा कार्यकाळ यावर्षी होत आहे. हरदीप सिंह पुरी आणि बीएल वर्मा या दोघांना नोव्हेंबर 2000  राज्यसभा पाठवण्यात आलं होतं. नोव्हेंबर 2026 यावर्षी कार्यकाळ संपणार आहे. तर हरदीप सिंह पुरी यांना जानेवारी 2018 रोजी उत्तर प्रदेशातून त्यांची निवड झाली होती. मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्यानंतर हरदीप सिंह पुरी यांची वर्णी लागली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशातून बिनविरोध राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

Loading...

उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून सोशल इंजिनीअरिंग 

पुढे 2024 साली तिसऱ्यांदा मोदी सरकारची (Modi Government) स्थापना झाली, तेव्हा त्यांची पेट्रोलियम मंत्री म्हणून नियुक्ती झाली. उत्तर प्रदेशमध्ये बीएल वर्मा यांची नोव्हेंबर 2020 साली राज्यसभेवर निवड झाली. त्यांची मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात आलं, त्यावेळी त्यांना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपने सोमवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सर्व वर्गातील समुदायांचा विचार करण्यात आलेला नाही. यात तीन ओबीसी, दोन दलित आणि एका ठाकूर समुदायातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यात बी.एल. वर्मा यांच्या जागी भाजपने (BJP) धर्मपाल सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. धर्मपाल सिंह सध्या उत्तर प्रदेशमध्ये पशुसंवर्धन मंत्री आहेत. तर नव्याने कोणाची वर्णी लागणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us