भाजपाचा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात तुफान खर्च; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती पैसे खर्च

| Updated on: Nov 13, 2021 | 7:15 AM

यावर्षी आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, या पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजपाने तब्बल 252 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आले.

भाजपाचा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात तुफान खर्च; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती पैसे खर्च
नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली – यावर्षी आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, या पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजपाने तब्बल 252 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आले. भाजपाने इलेक्शन कमिशनला दिलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशीलामधून ही माहिती समोर आली आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा 252,02,71,753 एवढा पैसा खर्च झाल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. आसाममध्ये प्रचारासाठी  43.81 कोटी तर पुद्दुचेरीमध्ये 4.79 कोटी रुपयांचा खर्च भाजपाने केला आहे.

बंगालमध्ये सर्वाधिक खर्च 

इलेक्शन कमिशनला देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे भाजपाने पाच राज्यांमध्ये एकूण 252 कोटींपेक्षा अधिक पैसा खर्च केला आहे. परंतु त्यातील जवळपास 60 टक्के पैसा हा पक्षाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी वापरला. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपाने तब्बल 151 कोटी रुपये खर्च केले तर तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी 22.97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पश्चिम बंगामध्ये भाजपाला आपले आमदार वाढवण्यात यश आले, मात्र तामिळनाडूमध्ये त्यांना अपेक्षीत यश मिळाले नसल्याचे दिसून येते. राज्यात भाजपाला केवळ 2.6 टक्के एवढेच मतदान झाले.

स्थानिक पक्षांनी अज्ञात स्त्रोतातून उभारला 445 कोटींचा निधी

दुसरीकडे ज्या राज्यांमध्ये यंदा निवडणुका झाल्या आहेत, त्या राज्यातील स्थानिक पक्षांनी विविध अज्ञात स्त्रोतातून 445 कोटी रुपयांचा निधी उभारल्याची माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने ही माहिती दिली. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत, त्या राज्यातील स्थानिक पक्षांनी अज्ञात स्त्रोतांमधून गेल्या दोन वर्षांमध्ये 445 कोटी कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

संबंधित बातम्या 

‘मला नेहमीच चुकीच्या पद्धतीने सादर केलं गेलं’, लग्न-अफेअर चर्चांवर अखेर नुसरत जहाँनी सोडलं मौन!

Uttar Pradesh: CM योगींचे भाषण ऐकून बदमाशाने जामीन घेण्यास दिला नकार; न्यायालयासमोर आत्मसमर्पण

जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात, तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल; राऊतांचा इशारा