सगळ्या मर्यादा ओलांडल्या! भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं CM विजय यांच्या आईविषयी वादग्रस्त वक्तव्य, राजकारण तापलं

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं CM विजय यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकारण तापलं आहे.

सगळ्या मर्यादा ओलांडल्या! भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं CM विजय यांच्या आईविषयी वादग्रस्त वक्तव्य, राजकारण तापलं
vijay thalapathy news
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 16, 2026 | 11:07 AM

तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्यावर निशाणा साधताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. थलपती विजय यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेते नैनार यांनी म्हटलं की, ‘घरात पोहोचल्यानंतर सर्वात आधी वडिलांना विचारतात. परंतु त्यावेळी घरात सापडत नाही. त्यावेळी आईला विचारलं पाहिजे की, वडील कोण आहेत? असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने नैनार वादात सापडले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष मुख्यालायतील कमलालयममधील शनिवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री विजय यांच्या एका वक्तव्यावर नैनार नागेंद्रन यांनी भाष्य केलं. त्यांच्या एका वक्तक्यावर भाष्य करताना नैनार यांनी म्हटलं की, ‘जेव्हा लोक घरात वडिलांना शोधतात, तेव्हा सापडत नाही. त्यावेळी घरात जाऊन आईला वडील कोण आहेत, हे विचारलं पाहिजे’. यांनंतर नैनार यांच्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांवर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप केला जात आहे. मंत्री राजमोहन यांनीही नैनार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर थलपती विजय यांनीही सहकाऱ्यांना संयमाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी नागेंद्रन यांच्याविरोधात पोलील स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्याचे बोलले जात आहे.

Loading...

नैनार नागेंद्रन यांच्या टिप्पणीवर भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षावर भाष्य केलं आहे. अन्नामलाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणातील मतभेद लोकशाहीचा भाग आहे. परंतु कोणत्याही नेत्याच्या आईविषयी व्यक्तिगत टिप्पणी करणे स्वीकारण्यासारखे नाही. राजकारणाने खालची पातळी गाठली आहे. या नेत्यांना विद्यार्थी आणि मुलांच्या समोर उदाहरण म्हणून उभे केले नाही पाहिजे’.

वादानंतर नैनार यांच्याकडून स्पष्टीकरण 

वादानंतर नैनार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटलं की, माझा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता. काही लोकांनी राजकीय फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने सादर केलं आहे. मी आई, मातृभूमी आणि मातृभाषेविषयी आदर आहे, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us