AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून ब्लॅक लिस्टची तयारी, या लोकांना तीन वर्ष मिळणार नाही नवीन सिम कार्ड

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरु केली आहे. या यादीत जे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात, त्यांच्या नावांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच जी लोक फ्रॉड मेसेज पाठवतात त्यांनाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे.

सरकारकडून ब्लॅक लिस्टची तयारी, या लोकांना तीन वर्ष मिळणार नाही नवीन सिम कार्ड
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 27, 2024 | 9:20 PM
Share

देशात सायबर फ्रॉडची प्रकरणे वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने ब्लॅक लिस्ट बनवण्याचे काम सुरु केले आहे. जी लोक दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड विकत घेतात त्यांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सायबर सुरक्षेसाठी धोकादायक व्यक्ती असल्याचे समजून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लोकांना तीन वर्षांपर्यंत नवीन सिम कार्ड मिळणार नाही. सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकारने उचललेले हे मोठे पाऊल आहे.

सरकार कारवाईच्या तयारीत

सीएनबीसी-आवाजच्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरु केली आहे. या यादीत जे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात, त्यांच्या नावांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच जी लोक फ्रॉड मेसेज पाठवतात त्यांनाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यांचे सध्याचे सिम कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सहा महिन्यांपासून ती वर्षांपर्यंत नवीन सिम कार्ड मिळणार नाही.

नोटिसीवर मागितले उत्तर

सरकार ब्लॅकलिस्टमध्ये नाव टाकण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून नोटीसवर उत्तर मागवणार आहे. उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. तसेच व्यापक जनहित लक्षात घेऊन काही जणांना नोटीस न देताही त्यांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. सरकारकडून सायबर क्राईम रोखण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात आहे.

1,32,000 आयएमईआय नंबर ब्लॉक

सरकारने काही दिवसांपासून सायबर क्राईम रोखण्यासाठी कॉलर ट्यून चालवण्याचे आदेश दिले होते. हे अभियान तीन महिन्यांपर्यंत चालणार आहे. तसेच सरकारने संसदेत सांगितले की, सायबर अपराध रोखण्यासाठी सरकारने 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत 6.69 लाख सिम कार्ड आणि 1,32,000 आयएमईआय नंबर ‘ब्लॉक’ केले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?