AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांची सुरक्षा भेदली, युवक सरळ पोहचला मोदींजवळ, आता पोलीस काय म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी पंतप्रधान जनतेचे अभिवादन स्वीकारत होते. त्यावेळी जमावातून एक मुलगा त्यांच्या अगदी जवळ गेला. तो त्यांना हातातील फुलांची माळा होती.

पंतप्रधानांची सुरक्षा भेदली, युवक सरळ पोहचला मोदींजवळ, आता पोलीस काय म्हणतात...
पंतप्रधान
| Updated on: Jan 13, 2023 | 11:31 AM
Share

हुबळी : कर्नाटकात (Karnataka) कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ एक युवक पोहोचला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कर्नाटकमधील हुबळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोदरम्यान ही घटना घडली. या घटनेवर पोलिसांचे स्पष्टीकरण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी पंतप्रधान जनतेचे अभिवादन स्वीकारत होते. त्यावेळी जमावातून एक मुलगा त्यांच्या अगदी जवळ गेला. तो त्यांना हातातील फुलांची माळा होती. ती माळाही मोदी यांनी स्वीकरल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) रक्षकही चकीत झाले. एसपीजी कमाडोंनी त्या मुलाला बाजूला केले. त्याच्या हातातील पुष्पहार सुरक्षा रक्षकांनी घेतला व मग तो पंतप्रधानांना दिला. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत ही घटना म्हणजे गंभीर चुक असल्याचे मत सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण : कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर झालेली नसल्याचा दावा हुबळी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्यापूर्वी कसून तपासणी करण्यात आली होती. ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या रस्त्याचा संपूर्ण भाग स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ने आपल्या ताब्यात घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 12 जानेवारीला हुबळी येथे रोड शो केला. जिथे त्याच्या सुरक्षेत त्रुटी होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.