अरे काय हे ! लग्नमंडपातच वधूने वराला दिलं छोटसं काम, अपयशी ठरल्यावर थेट…
Dulha Dulhan Viral Shadi: बिहारमधील एका लग्नाची सध्या खूप चर्चा होत आहे. वधूने मंडपात वराला एक टास्क दिला, पण वराला ते काम पूर्ण करता आले नाही, तेव्हा वधूने लग्न मोडले. लाखो वेळा समजावून सांगूनही वधूने कोणाचच ऐकलं नाही. पुढे काय झालं ? चला जाणून घेऊ..

लग्न करणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. लोक काळजीपूर्वक विचार करून त्यांचा जोडीदार निवडतात. पण कधीकधी आपला जीवनसाथी निवडताना आपण फसू शकतो. बिहारमधील पूर्व चंपारणमधूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. तिथे वराकडच्या लोकांनी वधूपासून एक सत्य लपवले होते. पण वरमाला झाल्यानंतर वधूला वरावर संशय आला. त्यानंतर तिने वराला एक असं टास्क दिलं, की वराचं गुपित सर्वांसमोर उघड पडलं आणि सर्वांना सत्य समजलं.
मग काय… वराला ते काम पूर्ण करता आले नाही. मग वधून लग्न करण्यास थेट नकार दिला. ती म्हणाली – मी तुझ्याशी लग्न करणार नाही. वरात परत घेऊन जा. पण तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यानांच धक्का बसला. घरच्यांनी मिळून वधूची खूप समजूत घातली ,पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. वधू काही तिच्या निर्णयापासून डगमगली नाही. त्यानंतर बराच गोंधळ झाला. मात्र वधूपक्षाने वरासह त्याच्या सर्व लोकांना बंधक बनवलं. अखेर पोलीस आले आणि सर्वांची सुटका झाल. थकला भागलेला वर, त्याची वरत घेऊन वधूविनाच घरी परत गेला.
हे प्रकरण भुराखल गावाचे आहे. घोरासहनच्या कदमवा गावातील प्रमोद पासवान यांचा मुलगा लवकुश कुमार याची लग्नाची वरात बुधवारी वधूच्या घरी पोहोचली. नाचत गात आलेल्या या वरातीचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. मात्र वरमाला घालायच्या वेळीच वधूला वराबद्दल काही शंका येऊ लागल्या. तिला वाटले की तिचा होणारा नवरा कदाचित अशिक्षित आहे. पण हे सत्य कसे समोर आणता येईल? असा प्रश्न तिला पडला. बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. सप्तपदी घेण्यासाठी वधू मंडपात बसली तेव्हा तिने वराला एक टास्क दिला. तू हे रुपये माझ्यासमोर मोजून मला दाखव, असं वधूने वराला सांगितलं.
वर बदलण्याचा आरोप
वधूच बोलणं ऐकून सगळे हैराण झाले. तू हे काय करत्येस ? असं तिला एकाने विचारल्यावर तिने वराबद्दल तिला वाटणारी शंका बोलून दाखवली. हा (होणारा नवरा) अशिक्षित आहे असं मला वाटतंय, जर हे चुकीचं असेल तर त्याने हे पैसे मोजून धाकवावेत, असं आव्हान वधूने दिलं. मात्र वर काही ते काम पुर्ण करू शकला नाही आणि सर्वांसमोर सत्य उघड झालं. तो (वर) खरंच अशिक्षित होता. ते ऐकून वधून मंडपातून उठली आणि लग्न करण्यास नकार दिला. ‘ मी हे लग्न करणार नाही , सत्य काय आहे ते आम्हा सर्वांपासून लपवून ठेवण्यात आलं होतं. वर हा शिकलेला आहे, असं सांगण्यात आलं होतं, पण तो तर साधे , थोडे पैसेही मोजू शकत नाही’ असं वधू म्हणाली. एवढंच नव्हे तर नवरा मुलगा बदलण्यात आला आहे, असाही आरोप तिने केला. लग्न ठरवताना ज्या मुलाचा फोटो आम्हाला दाखला, तो हा मुलगा नाही, असंही ती म्हणाली.
वराच्या कुटुंबाला ठेवलं ओलीस
यानंतर लग्न समारंभात मोठा गोंधळ उडाला. यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी वर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ओलीस ठेवले. गुरुवारी दुपारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. अखेर पोलिस स्टेशनचे प्रभारी विनीत कुमार त्यांच्या टीमसह भुरा खाल येथील वधूच्या घरी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करून वर आणि त्याच्या कुटुंबाची सुटका केली आणि त्यांना घरी पाठवले. त्यामुळे हे लग्न सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
