AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातसारखीच उत्तर प्रदेशातही घडली दुर्घटना, नदीत पाणी नव्हते म्हणून…

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर सोमवारी उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातही भीषण दुर्घटना घडली आहे.

गुजरातसारखीच उत्तर प्रदेशातही घडली दुर्घटना, नदीत पाणी नव्हते म्हणून...
| Updated on: Oct 31, 2022 | 6:11 PM
Share

नवी दिल्लीः गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर सोमवारी उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातही भीषण दुर्घटना घडली आहे. छठ पूजेदरम्यान कर्मनाशा नदीवर बांधलेला पूल अचानक कोसळल्याने पुलावर उभा असलेले 12 हून अधिक लोक नदीत पडले. नदीवरचा पूल अचानक कोसळल्याने उपस्थित असलेल्या लोकांनी प्रचंड गोंधळ घातला. आरडाओरड झाल्यानंतर आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी नदी पात्रात पाणी कमी असल्याने कोणीही बुडाले नाही. घटना घडल्यानंतर जवळ राहत असलेल्या नागरिकांनी मदतकार्य चालू केले.

त्यामुळे पाण्यात पडलेल्या 12 जणांचा जीव वाचला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ही दुर्घटना चंदौली जिल्ह्यातील चकिया कोतवाली भागातील सरैया गावात घडली आहे. चार दिवस चाललेल्या छठ उत्सवाचा हा आजचा शेवटचा दिवस होता.

या दिवशी स्त्रिया उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन 36 तासांचा उपवास सोडतात. या कार्यक्रमानिमित्त सरैय्या गावातून वाहणाऱ्या कर्मनाशा नदीजवळ पहाटेपासूनच महिला जमा झाल्या होत्या.

नदीजवळ महिला पूजा करत असतानाच त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबीय नदीच्या पुलावर उभे राहून पूजा पाहत होते. त्यावेळीच ही दुर्घटना घडली.

छठ पूजा चालू असतानाच नदीवरील पूर कोसळून दुर्घटना घडली. पुलावर 12 हून अधिक जण उभा असल्याचे महिलानी सांगितले.

पुलावर उभा राहिलेले सर्वजण नदीत पडल्यानंतर प्रचंड गोंधळ माजला. पूल कोसळल्यानंतर नदीत पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

पूल कोसळल्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे नागरिकांनी लगेच मदत करुन लोकांना बाहेर काढले. नदीत पाणी नसल्याने कोणीही बुडाले नाही. यावेळी चेंगराचेंगरीही होऊन अनेक जण जखमी झाले आहेत.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.