सर्वसामान्यांना धक्का, सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या दरात वाढ

एलपीजी आता आणखी महागलं आहेत (LPG Gas Cylinder Price Increased). इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार (आईओसीएल), यंदा विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो)दरात 76.5 रुपयांची वाढ झाली आहे.

सर्वसामान्यांना धक्का, सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या दरात वाढ

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यातही सामान्य नागरिकांना धक्का दिला आहे. या कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे एलपीजी आता आणखी महागलं आहेत (LPG Gas Cylinder Price Increased). इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार (आईओसीएल), यंदा विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो)दरात 76.5 रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रामच्या विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता 681.50 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे (LPG Gas Cylinder Price Increased). तर मुंबईत गॅसची किंमत 651 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या गॅस सिलेंडरची (14.2 किलो) किंमत 605 रुपये होती.

व्यावसायिक गॅस सिलिंडर (19 किलो)च्या दरातही 119 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत दुकानदारांना आता व्यावसायिक सिलिंडरसाठी तब्बल 1204 रुपये मोजावे लागणार आहेत. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1085 रुपये होते. तर पाच किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतही 264.50 रुपयांनी वाढ झाली आहे. हे वाढलेले दर शुक्रवारी 1 नोव्हेंबरपासून लागू होतील.

इतर महानरांतील दर

कोलकातामध्ये 14.2 किलोग्रामच्या विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची नवी किंमत 706 रुपये असेल. मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 651 रुपये असेल. चेन्नईमध्ये या सिलिंडरची किंमत 696 रुपये असेल. तर व्यावसायिक सिलिंडरचेही दर वधारले आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची नवी किंमत 1204 रुपये इतकी असेल, कोलकाता येथे या सिलिंडरची किंमत 1258 रुपये असेल, मुंबईमध्ये 1151.50 रुपये, तर चेन्नईमध्ये हा सिलिंडर 1319 रुपयांमध्ये मिळेल.

सलग तिसऱ्या महिन्यात दरवाढ

ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर हे 639.50 रुपयांना उपलब्ध होता. तर सप्टेंबरमध्ये याची किंमत 605 रुपये होती. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. तीन महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या बाजार दरात जवळपास 105 रुपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 193 रुपयांची वाढ झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडर हे 611.50 रुपयांना मिळायचं, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर हे 1095 रुपयांना मिळत होतं. गॅसच्या या वाढलेल्या किंमतीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *