AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?

सध्या सुरू असलेल्या इराण युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होईल, भारताला सर्वाधिक धोका कोणाचा आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशभरातील लोकांनी या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले आहे.

चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?  C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?
narendra modi and india and china
| Updated on: Apr 04, 2026 | 7:29 PM
Share

C-Voter Survey : सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा भारतावर काय परिणाम पडणार? भारतासाठी चीन धोकादायक आहे की पाकिस्तान? युद्धाच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण कसे आहे? असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोदणायसाठी सी-व्होटरने मार्च महिन्यात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक आठवड्यात लोकांनी या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी दिली आहेत.

भारताने सर्वाधिक विश्वास कोणत्या देशावर ठेवायला हवा?

या सर्वेक्षणात लोकांना भारताने कोणत्या देशावर सर्वाधिक विश्वास ठेवायला हवा, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर लोकांना वेगवेगळे दिले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण 67 टक्के लोकांनी भारताने रशियावर विश्वास ठेवायला हवा, असे मत व्यक्त केले. तिसऱ्या आठवड्यात 73 टक्के तर चौथ्या आठवड्यात 70 टक्के लोकांनी रशियावर विश्वास ठेवायला हवा, असे मत व्यक्त केले. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात क्रमश: 10, 11 आणि 14 टक्के लोकांनी अमेरिकेवर विश्वास ठेवायला हवा असे मत व्यक्त केले. दुसऱ्या आठवड्यात 23 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 16 टक्के आणि चौथ्या आठवड्यातही 16 टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

भारताला सर्वात मोठा धोका कोणाचा?

मार्च महिन्यात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात भारताला सर्वाधिक धोका कोणत्या देशाचा आहे, असेही विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना दुसऱ्या आठड्यात 41 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 44 टक्के तसेच चौथ्या आठवड्यात 44 टक्के लोकांना चीन भारतासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे वाटले. पाकिस्तान भारतासाठी धोका आहे, असे सांगणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात क्रमश: 30, 31, 34 टक्के आहे.

देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत समाधानी आहात का?

या सर्वेक्षणात लोकांना तुम्ही देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत संतुष्ट आहात का, असे विचारण्यात आले. याचे उत्तर देताना आम्ही समाधानी आहोत असे सांगणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात क्रमश: 27, 33, 32 टक्के आहे. काही प्रमाणात समाधानी असणाऱ्यांचे प्रमाण हे दुसऱ्या आठवड्यात 24 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 22 टक्के आणि चौथ्या आठवड्यात 21 टक्के आहे. काही प्रमाणात समाधानी नसणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अनुक्रमे, 25, 20, 22 टक्के आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत नसणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 18, 20, 20 टक्के आहे.

युद्धाचा भारतातील कोणत्या क्षेत्रावर परिणाम पडेल?

या प्रश्नाचे उत्तर देताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 45, 50, 47 टक्के आहे. परराष्ट्र धोरणावर परिणाम होईल असे सांगणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 16, 13, 16 टक्के आहे. राजकारणावर परिणाम होईल असे मत मांडणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 11, 13,13 टक्के आहे. काहीही सांगता न येणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात 18, 16, 15 टक्के आहे. अन्य क्षेत्रात परिणाम पडणार आहे, असे सांगणाऱ्यांचे मत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 10, 8, 9 टक्के आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?