तुमच्याकडे आरक्षित केलेले हे तिकीट असल्यावर टीटी रेल्वेतून उतरवणार, रेल्वेचा हा नियम कधीपासून?

indian railway reservation coach rule: वेटींग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास 440 रुपये दंड लागणार आहे. दंड भरुन प्रवाशांची सुटका होणार नाही. त्यांना त्या आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही. टीटी दंड वसूल केल्यानंतर वेटींगवर असणाऱ्या प्रवाशांना त्या डब्यातून उतरवून देणार आहे.

तुमच्याकडे आरक्षित केलेले हे तिकीट असल्यावर टीटी रेल्वेतून उतरवणार, रेल्वेचा हा नियम कधीपासून?
indian railway reservation coach with passenger and tte
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 1:24 PM

भारतीय रेल्वेतून रोज कोट्यवधी प्रवाशी प्रवास करतात. परंतु प्रवास करताना हजारो जणांचे तिकीट कन्फर्म होत नाही. ऑनलाईन केलेले तिकीट प्रतिक्षा यादीवर असल्यास रद्द होते. परंतु काऊंटरवर काढलेले तिकीट रद्द होत नाही. यामुळे अनेक जण वेटींग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करतात. आता वेटींग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करण्यासंदर्भात १ जुलैपासून मोठे बदल करण्यात आले आहे. वेटींग तिकिटावर रेल्वे प्रवास केल्यास दंड लागणार आहे. तसेच टीटी रेल्वेतून उतरवूनसुद्धा देणार आहे. रेल्वेचा हा नियम इंग्रजांच्या काळापासून आहे. परंतु त्याची अंमलबजावणी आता कठोरपणे सुरु झाली आहे.

रेल्वेने आरक्षित डब्यातून वेटींग तिकिटावर प्रवास करण्यास पूर्णपणे निर्बंध आणले आहे. म्हणजेच तुमचे वेटींग तिकीट असल्यास एसी किंवा स्लीपर कोचमधून तुम्ही प्रवास करु शकत नाही. १ जुलै पासून या निर्णयाचा अंमलबजावणी सुरु आहे. जुलै महिन्यापूर्वी वेटींग तिकिटावर प्रवास करणारे प्रवाशी प्रवास करु शकत होते. परंतु नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे त्याचा परिणाम वेटींगवर प्रवास करणाऱ्या लाखो लोकांवर सुरु झाला आहे.

हा नियम इंग्रज काळापासून

रेल्वेत प्रतिक्षा यादीवर असताना प्रवास करण्यास प्रतिबंध करणारा नियम इंग्रजांच्या काळापासून असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु या नियमाचे पालन होत नव्हते. आता रेल्वेने या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ऑफलाईन तिकीट काढले असले तरी ते रद्द करुन पैसे परत घ्यावे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

किती लागणार दंड

रेल्वेने आपल्या आदेशात म्हटले आहे की, वेटींग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास 440 रुपये दंड लागणार आहे. दंड भरुन प्रवाशांची सुटका होणार नाही. त्यांना त्या आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही. टीटी दंड वसूल केल्यानंतर वेटींगवर असणाऱ्या प्रवाशांना त्या डब्यातून उतरवून देणार आहे. त्या प्रवाशांना जनरल कोचमध्ये पाठवण्याचा अधिकार टीटीकडे असणार आहे. रेल्वेने हा आदेश पाच हजार प्रवाशांची आलेल्या तक्रारीनंतर केला आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.