CBI अधिकाऱ्यांसाठी ‘ड्रेस कोड’, कार्यभार सांभाळताच सुबोध कुमार जयस्वालांचा निर्णय

CBI चे अधिकारी आता कामावर असताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालू शकणार नाहीत. सुबोध जयस्वाल यांनी कार्यभार हाती घेताच CBI अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवला आहे.

CBI अधिकाऱ्यांसाठी 'ड्रेस कोड', कार्यभार सांभाळताच सुबोध कुमार जयस्वालांचा निर्णय
सुबोधकुमार जयस्वाल, सीबीआय, संचालक

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि नुकताच सीबीआयच्या (CBI) प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळलेले सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal)यांनी सीबीआय कार्यालयात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता CBI चे अधिकारी आता कामावर असताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालू शकणार नाहीत. सुबोध जयस्वाल यांनी कार्यभार हाती घेताच CBI अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवला आहे. त्यानुसार आता CBI मधील अधिकारी आणि कर्मचारी फॉर्मल कपड्यांमध्येच पाहायला मिळतील. (CBI Officers have to wear formal attire at office)

CBI चे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या आदेशानुसार सहाय्यक संचालक (प्रशासन) अनूप टी मॅथ्यू यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार CBI कार्यालयात आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून येता येणार नाही. पुरुष अधिकाऱ्यांना कार्यालयात फॉर्मल शर्ट-पॅन्ट आणि फॉर्मल शूज घालूनच यावं लागणार आहे. त्याचबरोबर योग्य पद्धतीने दाढी / शेविंग करावं लागणार आहे. तर महिला अधिकाऱ्यांनी फक्त साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट घालूनच कार्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सीबीआय अधिकाऱ्यांकडून जयस्वाल यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. तसंच यापुढेही अनेक महत्वाचे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सीबीआयचे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल

सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी 26 मे रोजी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर सीबीआय संचालकपदी त्यांचीच नियुक्ती करण्यात आली. 1985 च्या बॅचमधील जयस्वाल यांची 2 वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यापासून ही 2 वर्षांची मुदत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी सीबीआय संचालकाच्या स्पर्धेतील 2 नावांवर फुली मारली आहे. त्यामुळे या पदावर जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल 90 मिनिटे ही मिटिंग चालली. यावेळी रमन्ना यांनी एका महत्त्वाच्या नियमाचा हवाला देऊन या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली होती.

कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

  • सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.
  • RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली
  • सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता
  • सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.
  • मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
  • जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.

संबंधित बातम्या :

माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

CBI Officers have to wear formal attire at office

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI