Attack on Punjab Police : पंजाब पोलीस इंटेलिजन्स मुख्यालयावर चालत्या कारमधून रॉकेट डागले; सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हल्लेखोरही दिसले; 3 तरुणांना अटक

| Updated on: May 11, 2022 | 5:59 PM

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर सोमवारी रात्री 7.45 वाजता हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 20 हून अधिक संशयितांना अटक केली आहे. याशिवाय 7 हजार कॉल्सची चौकशी सुरू आहे.

Attack on Punjab Police : पंजाब पोलीस इंटेलिजन्स मुख्यालयावर चालत्या कारमधून रॉकेट डागले; सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हल्लेखोरही दिसले; 3 तरुणांना अटक
पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स मुख्यालय
Image Credit source: tv9
Follow us on

चंदीगड : मोहालीमध्ये (Mohali) पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचे पहिले सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यामध्ये हल्लेखोरांनी कारमधूनच रॉकेट डागल्याचे दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा कारही तिथून जाताना दिसत आहे. तर फुटेजमध्ये हल्लेखोरांनी स्विफ्ट कार वापरल्याचे दिसत आहे. तर हल्ला करणारे संशयित हल्लेखोरही त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) दिसले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी पहिले नाव हे तरनतारनच्या भिखीविंड येथील रहिवासी असलेल्या निशान सिंहचे आहे. निशान सिंग हा तरनतारन भिखीविंडमधील कुला गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दीड महिन्यापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. त्याचे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. मोहाली आणि फरीदकोटच्या पोलिसांनी (Faridkot Police) संयुक्त कारवाई करत त्याला फरीदकोट येथून अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर निशानचा मेहुणा सोनू याला अमृतसर येथून अटक करण्यात आली. तरनतारनच्या मेहंदीपूर गावातील रहिवासी जगरूप सिंग यालाही मोहाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो पॅरोलवर बाहेर आला आहे. मेहंदीपूर हे गावही भारत-पाक सीमेजवळ आहे.

पाकिस्तानी कनेक्शन

हे सुद्धा वाचा

आता या कटाचे पाकिस्तानी कनेक्शनही समोर येत आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानात बसलेला कुख्यात गुंड हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याचा हात असल्याचे मानले जात आहे. रिंडाने हे रॉकेट लाँचर ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमध्ये बसलेल्या रिंडाच्या संपर्काबाबत पोलीस आता निशान सिंग आणि जगरूप सिंग यांची चौकशी करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार यांनी अलीकडेच अँटी गँगस्टर टास्क फोर्स तयार करून गुंडांवर मोठी कारवाई सुरू केली आहे.

हल्ल्यात रशियन रॉकेट लाँचर वापरले

हल्ल्यात रशियन रॉकेट लाँचरचा वापर करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा तो जप्त केल्यानंतर पोलिसांनी हा दावा केला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने ही शस्त्रे अफगाणिस्तानला प्रशिक्षणासाठी दिली होती. तालिबान्यांनी तिथे कब्जा केला. त्यानंतर ही शस्त्रे पाकिस्तानला विकण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हे रॉकेट लाँचर पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे. या हल्ल्यामागे पंजाब पोलिसांचे गुप्तचर रेकॉर्ड आणि नेटवर्क नष्ट करण्याचा कट होता. पंजाबचे डीजीपी व्हीके भवरा यांनी भीती व्यक्त केली आहे की हल्ल्यासाठी ट्राय नायट्रो टोल्युएन (टीएनटी) वापरला गेला असावा, म्हणजे संपूर्ण इमारत उडवण्याचा कट होता. तज्ज्ञांच्या मते, मोहालीमध्ये डागलेले रॉकेट ग्रेनेड अमेरिकेने अफगाणिस्तानला आणि नंतर तालिबानने पाकिस्तानला विकले होते.

पिझ्झा डिलिव्हरीचा पहिला क्लू

या प्रकरणातील पहिला सुगावा पोलिसांना पिझ्झा डिलिव्हरीवरून मिळाला. सोमवारी रात्री रॉकेट हल्ल्यापूर्वी इंटेलिजन्स विंगच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने पिझ्झा ऑर्डर केला होता. हल्ल्यापूर्वी तो पिझ्झा घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यानंतर संशयित स्विफ्ट कार पार्किंगमध्ये उभी होती. जेव्हा तो पिझ्झा घेऊन आत परतला तेव्हा रॉकेट हल्ला झाला. हे पाहून तो तात्काळ गाडी पाहण्यासाठी बाहेर धावला. तोपर्यंत गाडी तिथे नव्हती. पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या मुलानेही ही कार पाहिली होती. या दोघांची चौकशी करूनच पोलिसांनी तपासाला पुढे नेले.

कार डेराबस्सी मार्गे अंबालाला

स्विफ्ट कारच्या शोधात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. रॉकेट हल्ल्यानंतर ही गाडी डेराबस्सीकडे गेल्याची माहिती मिळाली. तेथून दप्पड टोल प्लाझाजवळून गेली. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार दिसली. त्यानंतर ही गाडी अंबालाकडे गेल्याचे दिसले. तेथून काल पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

20 हून अधिक संशयित ताब्यात

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर सोमवारी रात्री 7.45 वाजता हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 20 हून अधिक संशयितांना अटक केली आहे. याशिवाय 7 हजार कॉल्सची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांना काही सांगता आलेले नाही. डीजीपी व्हीके भवरा यांनी निश्चितपणे दावा केला आहे की त्यांना मोठे लीड्स मिळाले आहेत. लवकरच हल्लेखोरांना अटक करून संपूर्ण कटाचा उलगडा होईल.