केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार, सरकारचा नवा आदेश

| Updated on: Feb 14, 2021 | 10:28 PM

कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार, सरकारचा नवा आदेश
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना आता कामाच्या दिवशी कार्यालयात जावण लागणार आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीसह सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.(Central government employees will now have to work from the office)

दरम्यान कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाणार, असल्याची माहितीही कार्मिक मंत्रालयानं दिली आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झोन डी-नोटीफाईड होत नाही तोपर्यंत त्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कार्यालयांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवा SOP जारी केला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात उपस्थित राहून काम करावं लागणार आहे.

निर्जंतुकीकरणानंतर पुन्हा कामाला सुरुवात

जर एखाद्या कार्यालयात कोरोना संसर्गाचे 1 किंवा 2 प्रकरणं समोर आली तर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया फक्त त्या जागेपुरती किंवा परिसरापुरती मर्यादित असेल. कोरोना रुग्ण गेल्या 48 तासांत ज्या परिसरात काम करत होता किंवा ज्या परिसरात गेला होता, त्या परिसराचं निर्जंतुकीकरण केलं जाईल. त्यानंतर त्या कार्यालयात पुन्हा कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रविवारी सांगितल्यानुसार भारतात 1 ऑक्टोबर 2020 पासून सातत्याने कोरोना मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात जास्ती आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्मिक मंत्रालयानं दिली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने मे 2020 मध्ये उपसचिव स्तराखालील 50 टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयातून काम करण्यास सांगितलं होतं. आता अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनंतर विभागाच्या प्रमुखांनी निश्चित केलेल्या कार्यालयातील गर्दीपासून वाचण्यासाठी वेळेचं पालन केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

चिंताजनक..हिंगणघाटच्या ‘त्या’ शाळेतील कोरोनाबाधितांची शंभरी पार, अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह 23 जण RTPCRमध्ये पॉझिटिव्ह

नागपुरात वाढता कोरोनाचा संसर्ग, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Central government employees will now have to work from the office