AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोलबाबत सरकारचा नवा अत्यंत मोठा निर्णय, मोठा दणका, थेट इंधनावरील..

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका आहे. यादरम्यानच अर्थव्यवस्थेवरील ताण दूर करण्याकरिता केंद्र शासनाकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. आता तेल कंपन्यांना जोरदार धक्का देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आला.

पेट्रोलबाबत सरकारचा नवा अत्यंत मोठा निर्णय, मोठा दणका, थेट इंधनावरील..
Oil Companies
| Updated on: May 16, 2026 | 8:12 AM
Share

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली. तब्बल 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेल वाढले आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतात थेटपणे फटका बसताना दिसत आहे. एक तर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आणि त्यातच आता किमतीमध्ये वाढ झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्याचे आवाहन जनतेला केले. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची टंचाई बघायला मिळतंय. यादरम्यान सरकारकडून आता ग्राहकांनंतर थेट पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यालाही मोठा धक्का सरकारकडून देण्यात आला. पेट्रोलियम कंपन्यांच्या परदेशी नफ्याला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर 3 रुपये अतिरिक्त नफा कर लावला आहे. हा थेट पेट्रोलियम कंपन्यांसाठी मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. याचा थोडक्यात अर्थ असा होतो की, एखाद्या पेट्रोलियम कंपनीने परदेशात पेट्रोल निर्यात केले तर तिला मिळणाऱ्या नफ्यावर सरकारला प्रति लिटर 3 रुपये कर भरावा लागेल. हा सरकारचा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल.

बऱ्याच तेल कंपन्या परदेशात पेट्रोल निर्यात करतात. आता त्यावरही सरकारकडून शुल्क आकारण्यात आले. अशा तेल कंपन्यांना सरकारला पैसा द्यावा लागणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉलरपुढे रूपयाची किमती कमी होत आहे. यामुळेच केंद्र सरकारने काही गोष्टी नियंत्रणात आणण्याकरिता महत्वाचे आदेश काढली आहेत.

साखरेच्या निर्यातीवरही केंद्र सरकारने लगाम लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत सोने खरेदी न करण्यास सांगितले. नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस चालले तर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. होर्मुज खाडीत अजूनही भारताने मोठ्या प्रमाणात तेलवाहून जहाज अडकून पडली आहेत.

Follow Us
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार