AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, मोठा दणका, थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तब्बल..

Increase in petrol and diesel prices : आंतरराष्ट्रीय बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्याचाच परिणाम भारतात बघायला मिळतोय. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा मोठा फटका बसत आहे. त्यामध्येच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये.

Petrol-Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, मोठा दणका, थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तब्बल..
Petrol and diesel prices hiked
| Updated on: May 15, 2026 | 12:41 PM
Share

आंतरराष्ट्रीय बाजारात रूपया घसरत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम होत आहे. सोने आणि चांदीच्या भावानंतर सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. इराण अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस, पेट्रोल डिझेल यांची मोठी समस्या आहे. भारत मोठे प्रयत्न पेट्रोल आणि डिझेल भारतात आणण्याकरिता प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे मोठे आवाहन केले. एक वर्षाकरिता सोने खरेदी न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यानंतर आता थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत रूपयाची घसरण सुरू आहे. त्याचेच परिणाम आता बघायला मिळत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाची झळ थेट भारतीय नागरिकांना सहन करावी लागत आहे. सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल डिझेल याच्या किमतीत वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति 3 रूपयांनी वाढ करण्यात आली. हा सर्वसामान्य लोकांना मोठा झटका म्हणावा लागणार आहे. आता मुंबईत पेट्रोल 106.50 वर गेले तर डिझेल 93 रूपयांवर पोहोचले आहे.

सरकारकडून हे नवे दर आजपासून लागू करण्यात आलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव वाढल्याने ही वाढ केल्याचे सांगितेल जातंय. सरकारने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले जाणार नाहीत. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात सतत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. यादरम्यानच आता भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्यात आलेत.

भारताच्या शेजारील देशांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगणाला पोहोचले आहेत. सरकारने काल साखर निर्यातीवरील बंदीबाबत मोठा निर्णय घेतला आणि आज लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीला मार्ग काढण्याकरिता सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता टॅक्सीचालक आणि रिक्षाचालकही भाडेवाढ करण्याचे संकेत आहेत.

विविध शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मुंबई पेट्रोल- 106.68 रुपये प्रति लिटर (3.14 रुपयांची वाढ) डिझेल- 93.14 रुपये प्रति लिटर (3.11 रुपयांची वाढ) अमरावती पेट्रोल- 108.24 रुपये प्रति लिटर डिझेल- 94.74 रुपये प्रति लिटर नाशिक पेट्रोल- 107.93 रुपये प्रति लिटर डिझेल- 94.41 रुपये प्रति लिटर छत्रपती संभाजीनगर पेट्रोल- 108.56 रुपये प्रति लिटर डिझेल- 94.78 रुपये प्रति लिटर रत्नागिरी पेट्रोल- 108.63 रुपये प्रति लिटर डिझेल- 95.12 रुपये प्रति लिटर वसई-विरार पेट्रोल- 107.21 रुपये प्रति लिटर डिझेल- 93.68 रुपये प्रति लिटर नागपूर पेट्रोल- 107.18 रुपये प्रति लिटर डिझेल- 93.69 रुपये प्रति लिटर

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर