AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी थेट आकडेच मांडले, सांगितली आतली गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेल जपून वापरा, सोन्याची खरेदी कमी करा असं आवाहन जनतेला करण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा साठा नेमका किती शिल्लक आहे? यावर भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी थेट आकडेच मांडले, सांगितली आतली गोष्ट
chhagan bhujbalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 12, 2026 | 3:31 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला एकदा नाही तर दोनदा आवाहान केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सोनं कमी खरेदी करा, पेट्रोल, डिझेल, आणि एलपीजी गॅस या सारख्या इंधनाची बचत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या या आवाहानानंतर आता देशासह राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानंतर राज्यात सध्या स्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचा किती साठा शिल्लक आहे? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर भुजबळ यांनी दिली आहे.

भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं?  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं आहे त्याचा नक्कीच विचार व्हायला हवा.  ⁠ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नाही जे देश पेट्रोलवर अवलंबून आहे तिथे झालेली आहे. याचे परिणाम सर्वांवरच होत आहे.  ⁠काही दिवसांपूर्वी हाॅटेलवर निर्बंध होते हळूहळू ते सुरळीत केले, मात्र आता आपण त्या गोष्टी जपून वापरायला हव्यात. होर्मूजच्या खाडीत जे काही सुरू आहे त्यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. तिथे सर्व काही सुरळीत झालं तर काही अडचणी येणार नाहीत. मोदींनी दिलेला संदेश सर्वांसाठी आहे.  थोडं काटकसरीने धोरण सर्वांनी ठेवायला हवं, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज्यात इंधनाचा किती साठा शिल्लक?

दरम्यान राज्यात सध्या इंधनाचा किती साठा शिल्लक आहे, याची आकडेवारी देखील यावेळी भुजबळ यांनी सादर केली. सध्या स्थितीमध्ये राज्यात   ⁠पेट्रोल १ लाख ५९ लाख लिटर शिल्लक आहे.  डिझेल २ लाख ९८ हजार लिटर शिल्लक आहे.   ⁠केरोसीन ४ हजार किलोलीटर शिल्लक आहे. तर  ⁠एलपीजी ३५ हजार किलो शिल्लक आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. यासोबतच सर्वांनी आता काटकसरीचं धोरणं ठेवावं असं आवाहानही यावेळी भुजबळ यांनी केलं.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!