AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओळख ना पाळख, पोरगी विद्यार्थिनींचे एमएमएस पाठवतच राहिली; …ते व्हिडीओ मुंबईतही झाले व्हायरल?

चंदीगड एमएमएस प्रकरणाती धक्कादायक माहिती समोर येत असतानाच आता ते व्हिडीओ मुंबईतही व्हायरल झाल्याचे पोलिसांनी सांगितले...

ओळख ना पाळख, पोरगी विद्यार्थिनींचे एमएमएस पाठवतच राहिली; ...ते व्हिडीओ मुंबईतही झाले व्हायरल?
| Updated on: Sep 20, 2022 | 2:21 PM
Share

मोहालीः चंदीगड विद्यापीठातील (University of Chandigarh) एमएमएस प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. विद्यार्थिनींच्या अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यामध्ये आणखी एक आरोपीचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. ज्या तरुणीने हे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) केले आहेत, त्या मुलीच्या माध्यमातून आणखी एका मुलाचा यामध्ये समावेश झाला आहे. त्याचे नाव मोहित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्या तरुणाला ताब्यात घेतले आहेत, त्याच्यासोबत संभाषणाचे स्क्रीनशॉट पोलिसांना मिळून आले आहेत. मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे व्हिडीओ पाठवणारी मुलगी मोहितला कधीच भेटली नव्हती.

मात्र व्हॉट्सॲप आणि चॅटिंगच्या माध्यमातून ती त्याच्याशी संपर्कात आली होती अशी माहिती पोलिसांना तिने दिली आहे. इतकंच नाही तर विद्यार्थिनी जो व्हिडिओ तिच्या प्रियकर सनीला पाठवत होती, तोच व्हिडिओ मोहितलाही ती पाठवत होती.

या प्रकरणात आता मोहितचा समावेश झाला असल्याने तो मुलगा कोण आहे, तो कुठून आला आहे त्याची माहिती पंजाब पोलीस घेत आहेत. हिमाचल प्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या सनी मेहता आणि रंकज वर्मा या दोन आरोपींबरोबर मोहितचा काय संबंध आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडीओ पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले 4 मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून त्यांची बारकाईने तपासणी केली जात आहे.

या मोबाईल फोन्समधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी आणि व्हिडिओ कोणत्या नंबरवर पाठवण्यात आले याचीही माहिती घेतली जात आहे. या तिघांच्या मोबाईलवरून व्हॉट्सॲप ग्रुपही सापडले असून, त्यांचे मोबाईल क्रमांकही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या क्रमांकांची यादीही तयार केली गेली आहे.

या व्हॉट्सॲप ग्रुप्समधून जे व्हिडीओ शेअर केले गेले आहेत, त्याचाही शोध पोलीस घेत असून ज्या व्हाटस्अप ग्रुपमधून डेटा हटवला गेला असेल, तोही फॉरेन्सिक लॅबकडून परत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तरुणीच्या मोबाईलमधून 12 व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत.

एमएमएस प्रकरणात हिमाचल प्रदेशातून अटक केलेल्या दोन्ही मुलांच्या फोनवर चंदीगड विद्यापीठातील घटनेनंतर मुंबई आणि गुजरातमधील अनेक नंबरवरून कॉल आले आहेत. मुंबई आणि गुजरातमधून सतत येणाऱ्या कॉल्सबाबत दोन्ही आरोपी अद्याप पंजाब पोलिसांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.

या कारणास्तव आता पंजाब पोलीस मुंबई आणि गुजरातमधून येणाऱ्या या फोन कॉल्सचे नंबर ओळखण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी मुंबई आणि गुजरात पोलिसांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. या मुलीनी काही व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्या ग्रुप्समध्ये अनेक व्हिडिओ शेअर केले जात होते, आणि ग्रुपमधील इतर सदस्य हे व्हिडिओ फॉरवर्ड करत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.