AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 Update | ‘शिवशक्ती’ नावावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना ISRO प्रमुखांनी थेट दिलं असं उत्तर

Chandrayaan-3 Update | वादावर इस्रो चीफ काय म्हणाले? विक्रम लँडर चंद्रावर जिथे उतरला, त्या जागेला 'शिवशक्ती' पॉइंट असं नाव दिलं. त्याचवेळी चांद्रयान-2 मिशनमध्ये ज्या ठिकाणी पोहोचलो होतो, त्या जागेला 'तिरंगा' पॉइंट असं नाव दिलं.

Chandrayaan-3 Update | 'शिवशक्ती' नावावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना ISRO प्रमुखांनी थेट दिलं असं उत्तर
| Updated on: Aug 28, 2023 | 8:20 AM
Share

बंगळुरु : मागच्या आठवड्यात चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. सर्व भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. इस्रोच्या कामगिरीमुळे जगभरात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडरने चांद्रभूमीला स्पर्श केला. भारताने पहिल्यांदाच चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलय. याआधी चांद्रयान-2 मोहिम शेवटच्या टप्प्यात फसली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरुतील इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली.

त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना त्यांचं भरभरुन कौतुक केलं. त्याचवेळी विक्रम लँडर चंद्रावर जिथे उतरला, त्या जागेला ‘शिवशक्ती’ पॉइंट असं नाव दिलं. त्याचवेळी चांद्रयान-2 मिशनमध्ये ज्या ठिकाणी पोहोचलो होतो, त्या जागेला ‘तिरंगा’ पॉइंट असं नाव दिलं.

सोमनाथ वादावर काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे नाव दिलय शिवशक्ती, त्यावरुन आता वाद निर्माण झालय. काहींनी त्यावर वेगळ मत नोंदवलय. स्वत: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलय. ‘शिवशक्ती’ नाव देण्यावरुन काहीही वाद नाहीय. यात काहीही चुकलेलं नाही असं इस्रोच्या प्रमुखांनी म्हटलय. चांद्रयान-3 जिथे उतरलं, त्या जागेला शिवशक्ती नाव का दिलं? त्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला, असं सोमनाथ म्हणाले.

विज्ञान आणि विश्वासाबद्दल इस्रो चीफ काय म्हणाले?

“शिवशक्ती आणि तिंरगा पॉइंट दोन्ही नाव भारतीयच आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे” असं सोमनाथ म्हणाले. “एस.सोमनाथ यांनी केरळ तिरुअनंतपूरम येथील एका मंदिरात दर्शन घेतलं. विज्ञान आणि विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याची सरमिसळ करु नये” असं सोमनाथ यांनी सांगितलं.

मी मंदिरात का जातो?

“मी संशोधक आहे. चंद्रावर संशोधन करतोय. विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणं हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे मी मंदिरात जातो, धार्मिक-शास्त्रीय पुस्तकांच वाचन करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. बाहेरच्या जगाचा शोध घेण्यासाठी मी विज्ञानाचा आधार घेतो आणि आतमधून स्वत:चा शोध घेण्यासाठी मंदिरात येतो” असं इस्रोच्या प्रमुखांनी सांगितलं. ….तर लँडर फेल होईल

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव खूप कठीण आहे. इथे डोंगर, दऱ्यांचा भाग आहे. छोट्याशा चुकीमुळे मिशनमध्ये लँडर फेल होऊ शकतो असं सोमनाथ यांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?