Chandrayaan 3 update | चांद्रयान 3 मिशनसाठी आजची रात्र महत्वाची, ISRO नेमकं काय करणार?

Chandrayaan 3 update | चांद्रयान 3 साठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. ISRO आज रात्री एक अवघड मॅन्यूव्हर पार पडणार आहे. आतापर्यंत यशस्वीपणे कक्षा विस्ताराचे पाच टप्पे पार पडले आहेत.

Chandrayaan 3 update | चांद्रयान 3 मिशनसाठी आजची रात्र महत्वाची, ISRO नेमकं काय करणार?
इस्रोने शुक्रवारी चांद्रयान 3 च यशस्वी प्रक्षेपण केलं. LVM रॉकेटद्वारे हे लाँन्च झालं. ठरवलेल्या योजनेनुसार, पृथ्वीपासून 36,500 किलोमीटर अंतरावर अत्यंत अचूक कक्षेत चांद्रयान 3 ला स्थापित करण्यात आलं. त्यामुळे इस्रोचा आत्मविश्वास दुणावला आहे. मागच्या चार वर्षांपासून चांद्रयान 3 च्या लाँन्चिंगची तयारी सुरु होती. भारतीयांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. प्रत्येक भारतीयाचा ऊर आज अभिमानाने भरुन आला आहे.
| Updated on: Jul 31, 2023 | 1:34 PM

मुंबई : मागच्या 15 दिवसांपासून पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या Chandrayaan-3 साठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO आज रात्री एक अवघड मॅन्यूव्हर पार पडणार आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं होतं. या मोहिमेच यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. चांद्रयान 3 अजूनही पृथ्वीच्या कक्षेत आहे. इस्रोने टप्याप्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार केला.

आता महत्वाचा कक्षा विस्तार पार पडेल. त्यानंतर चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. 1 ऑगस्टला रात्री 12 ते 1 दरम्यान चांद्रयान 3 ला चंद्राच्या दिशेने नेण्याच मॅन्यूव्हर होईल. चांद्रयान 3 च्या प्रोपलजन मॉड्युलच इंजिन प्रज्वलित करण्यात येईल. चांद्रयान 3 ला गती देण्यासाठी हे मॅन्यूव्हर करण्यात येईल.

आजची रात्र का महत्वाची?

चांद्रयान 3 चं इंजिन प्रज्वलित केल्यामुळे यानाला गती मिळेल. त्यामुळे हे यान सर्क्युलर लो अर्थ ऑरबिटमधून बाहेर पडून दुसऱ्या कक्षेत जाईल. एका ठराविक वेळासाठी इंजिन प्रज्वलित करण्यात येईल. पृथ्वीच्या कक्षेतच इस्रोकडून हा प्रयोग होणार आहे. या मॅन्यूव्हरमुळे चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचेल. सोप्या शब्दात चंद्राच्या सीमेजवळ जाईल.

सर्वात कठीण आणि अवघड टप्पा

14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान 3 ने उड्डाण केलं होतं. आतापर्यंत यशस्वीपणे कक्षा विस्ताराचे पाच टप्पे पार पडले आहेत. आता पुढच TLI मॅन्यूव्हर मोहिमेतील सर्वात कठीण आणि अवघड टप्पा आहे.

लँडरची गती नियंत्रित करणं हे शास्त्रज्ञांसमोर मोठं चॅलेंज

चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चांद्र केंद्रीत फेज सुरु होईल. त्यानंतर अनेक अवघड टप्पे आहेत. प्रोपलजन मॉड्युलपासून लँडर वेगळा होईल. ते लगेच होणार नाही. त्यानंतर सर्वात कठीण असा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रवास सुरु होईल. 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच नियोजन आहे. चंद्रावर उतरताना लँडरची गती नियंत्रित करणं हे शास्त्रज्ञांसमोर मोठं अवघड लक्ष्य आहे. चांद्रयान 2 मोहिम त्याच अखेरच्या टप्प्यात फसली होती.

फक्त एक दिवस चालतील इतकीच उपकरणाची क्षमता ?

चंद्राच्या पुष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान 3 मधून अनेक वैज्ञानिक उपकरण पाठवण्यात आली आहेत. तिथे खूप कडक्याची थंडी असते. त्या वातावरणात ही उपकरणं कशी चालतात हे सुद्धा महत्वाच आहे. चांद्रयान 3 मिशनचा एकूण खर्च 615 कोटी रुपये आहे. चांद्रयान 2 पेक्षा हा खर्च कमी आहे. विक्रम लँडरमधील उपकरण एक दिवस चालतील एवढ्याच क्षमतेची आहे. कारण पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो.