Mobile ban: एपनंतर आता स्वस्त चायनिज फोन, 12 हजारांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन विक्रीवर बंदीची शक्यता, देशांतर्गत कंपन्यांना लाभ

शाओमी सारख्या कंपन्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. लॉकडाऊनच्या काळात चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात मोठी आघाडी घेतली होती. कोरोनामुळे चीनमध्ये फोनची मागणी कमालीची घटलेली आहे.

Mobile ban: एपनंतर आता स्वस्त चायनिज फोन, 12 हजारांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन विक्रीवर बंदीची शक्यता, देशांतर्गत कंपन्यांना लाभ
स्वस्त स्मार्टफोन होणार बंद
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 8:54 PM

नवी दिल्ली – देशात चायनिज एप्सनंतर आता चिनी स्मार्टफोन (China Smart phone)कंपन्यांच्या काही मोबाईल्सवर बंदी (ban)घालण्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या 12 हजारांपेक्षा कमी किमतीच्या काही मोबाईल्सच्या विक्रीवर देशात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. चीनमधील अशा कंपन्या लो बजेट फोनच्या (Low budget phone)सेगमेंटमध्ये जगभरात अग्रस्थानी आहे. चिनी स्वस्त मोबाईल कंपन्यांवर बंदी घालण्याचे हे पाऊल देशांतर्गत मोबाईल कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उचलण्यात येणार असल्याची माहिती आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा शाओमी या कंपनीला बसेल. कारण बजेटमधील साम्र्टफोन विकण्यात ही कंपनी सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आयटेल, टेक्नो आणि इन्फिनिक्स यासारख्या स्वसंत मोबाईल विक्री करणाऱ्या कंपन्यांना आणि बाजारावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वस्त मोबाील विकणाऱ्या चिनी कंपन्या भारतीय बाजारात आल्यानंतर, लावा आणि मायक्रोमैक्स सारख्या घरगुती कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या विक्रीवर याचा वाईट परिणाम झाला होता.

एपल आणि सॅमसंगच्या विक्रीवर परिणाम होणार नाही

एपल आणि सॅमसंग कंपन्यांच्या मोबाईलची किंमत जास्त असल्याने त्यांच्यावर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येते आहे. हा निर्णय कधीपासून लागू होईल, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लॉकडाऊनच्या काळात चिनी कंपन्या भारतात लोकप्रिय

शाओमी सारख्या कंपन्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. लॉकडाऊनच्या काळात चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात मोठी आघाडी घेतली होती. कोरोनामुळे चीनमध्ये फोनची मागणी कमालीची घटलेली आहे.

चिनी मोबाईल कंपन्यांवर ईडीचे छापे

विवो कंपनीच्या विरोधात असलेल्या पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात 5 जुलै रोजी विवो आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर ईडीने छापेमारी केली होती. अनेक राज्यांत 44 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यानंतर कंपनीचे संचालक झएंगशेन ओउ आणि झांग जी हे देश सोडून पळून गेले होते. चिनी मोबाईल कंपन्यांवर रॉयल्टीच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवण्याचा आणि करचोरीचा आरोप आहे. एप्रिलमध्ये फेमा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी चिनी मोबाईल कंपनी शाओमीची 5551 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. देशात केलेली कमाी बेकायदेशीर मार्गाने देशाबाहेर पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. 2020 साली डोकलाम भागात झालेल्या चकमकीत 12 पेक्षा जास्त भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर, भारताने चिनी कंपन्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत 300हून अधिक चिनी एप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे.