AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 दिवसांत 8 शहीद जवानांचा बदला घेतला, छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचं एनकाउंटर

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आज दिवसभरात तब्बल 10 नक्षलवाद्यांचं एनकाउंटर केलं आहे. जवानांकडून अजूनही परिसरात ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच परिसरात 10 दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीला लक्ष्य करत स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. त्याचा बदला आज जवानांनी घेतला आहे.

10 दिवसांत 8 शहीद जवानांचा बदला घेतला, छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचं एनकाउंटर
10 दिवसांत 8 शहीद जवानांचा बदला घेतला, छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचं एनकाउंटर
| Updated on: Jan 16, 2025 | 8:42 PM
Share

भारतीय सुरक्षा दलाच्या गाडीला आयईडी बॉम्बने उडवून 8 जवांना शहीद करणाऱ्या राक्षसी नक्षलवाद्यांचा आज तितक्याच तीव्रतेने बदला घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज छत्तीसगडच्या बीजापुरात सर्च ऑपरेशन जारी करत एका-एका नक्षलवाद्याला बिळातून बाहेर काढत त्यांचा खात्मा केला आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आज दिवसभरात तब्बल 10 नक्षलवाद्यांचं एनकाउंटर केलं आहे. जवानांकडून अजूनही परिसरात ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे. या ऑपरेशनमधून कोणकोणत्या खतरनाक नक्षलवाद्याचा खात्मा झाला, याबाबतची माहिती आता लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडच्या बीजापूर येथे मोठ्या घातपाताची घटना घडली होती. नक्षलवाद्यांनी कुटरु परिसरात भर जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांच्या गाडीवर हल्ला केला होता. नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणत जवानांच्या गाडीला उडवलं होतं. या हल्ल्यात तब्बल 8 जवान शहीद झाले होते. तसेच एका ड्रायव्हरचादेखील मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. अखेर भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या घटनेनंतर अवघ्या 10 दिवसांत बदला घेतला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

जवानांनी नक्षलवाद्यांचा खात्मा कसा केला?

छत्तीसगढच्या बीजापूर येथे आज सकाळपासूनच सुरक्षाबल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचं मोठं यश पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना आलं आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. बीजापूरमध्ये तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दलाकडून मोठं ऑपरेशन सुरु आहे. या दरम्यान आज सकाळपासून सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये वारंवार फायरिंग सुरु होती.

पोलिसांना या चकमकीदरम्यान संबंधित परिसरातून एसएलआरसह अनेक हायटेक हत्यारं मिळाली आहेत. या ऑपरेशनमध्ये डीआरजी बीजापुर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोबरा 204, 205, 206, 208, 210 आणि केरिपु 229 बटालियन यांचा समावेश आहे. या सर्व बटालियनमधील जवान आक्रमकपणे नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करत असल्याची माहिती मिळत आहे. बीजापूरच्या मारुढबाका आणि पुजारी कांकेर परिसरात अजूनही जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....