Dyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांचा दोन दिवसीय दौरा तडकाफडकी रद्द, कारण आले समोर, दिल्लीत मोठी घडामोड?

CEC Dyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात विरोधक आक्रमक झाले आहेत. याच दरम्यान त्यांचा दोन दिवसीय दौरा तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे. याविषयीचे कारण ही समोर आले आहे. दिल्लीतील मोठी अपडेट काय?

Dyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांचा दोन दिवसीय दौरा तडकाफडकी रद्द, कारण आले समोर, दिल्लीत मोठी घडामोड?
ज्ञानेश कुमार
| Updated on: Oct 07, 2026 | 11:10 AM

Election Commission of India: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा दौरा अचानक रद्द झाला. 7 आणि 8 ऑक्टोबर या दरम्यान छत्तीसगडसाठी हा दौरा होणार होता. काही अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने याविषयीचे पत्र दिले. त्यानुसार ज्ञानेश कुमार यांना या दोन दिवसीय दौऱ्यात राज्याचे पाहुणे, अतिथी म्हणून संबोधण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांत देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. आता 10 ऑक्टोबर रोजी CJP मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. तर काल INDIA आघाडीने काल त्यांच्याविरोधात शक्तीप्रदर्शन केले. मतदार याद्यांमधील कथित घोळ, विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) विरोधक आक्रमक झाले आहेत.

देवदर्शन आणि धबधब्यावरही होते जाणार

Loading...

छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर होते. ते राज्याचे अतिथी म्हणून हा दौरा करणार होते. आज आणि उद्या असा त्यांचा हा दौरा होता. या दौऱ्यात ते दंतेवाडा येथेही जाणार होते. येथील दंतेश्वरी मंदिराला आणि कबीरधाममधील भोरमदेव येथील प्रसिद्ध मंदिरांना ते भेट देणार होते. तर बस्तर जिल्ह्यातील चित्रकूट धबधब्याची भेटही दौऱ्यात ठरली होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोनदा दौरा रद्द

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्तांचा मेरठ आणि वाराणसी येथील दौरा स्थगित करण्यात आला होता. आता छत्तीसगड येथील दौराही रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावर सध्या विरोधकांनी मोठा दबाव वाढला आहे. काल राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीतील प्रमुख 19 पक्षातील खासदारांनी मोठे आंदोलन केले. INDIA आघाडीने संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेस नेत्यांनी 8 तास धरणे आंदोलन केले. विरोधकांनी वोट चोर, गद्दी छोड आणि इतर घोषणाबाजी केली. आता 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीत धडक देणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us