
चीनने मोठा निर्णय घेतला आहे, चीनकडून अमेरिकेला रेअर अर्थ मिनरल्सचा पुरवठा करण्यात येत होता, मात्र आता चीनने रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, चीनने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे अमेरिकेला मोठा फटका बसणार आहे, कारण अमेरिकेचं उद्योगक्षेत्र हे पूर्णपणे रेअर अर्थ मिनरल्ससाठी चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनने उचललेल्या या पावलामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत मोठी घोषणा केली, त्यांनी चीनवर थेट 100 टक्के टॅरिफ लावला, त्यामुळे आता जगात एका नव्या व्यापर युद्धाला तोंड फुटलं आहे.
चीनकडून सातत्यानं अमेरिकेच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, चीनने आधी अमेरिकेला पुरवठा होणारं रेअर अर्थ मिनरल्स रोखलं, त्यानंतर लगेचच आणखी एक मोठा निर्णय घेतला, चीन हा अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे, मात्र चीनने अचानक अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेत भूकंप आला आहे, अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये हाहाकार उडाला आहे. हजारो टन सोयाबीन घेऊन चीनकडे निघालेल्या अमेरिकन जहाजांना चीनने वाटेतच थांबवलं आहे. चीनने अचानक अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी थांबवल्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, अमेरिकेमध्ये सोयाबीनंच उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, अशा स्थितीमध्ये जर सोयाबीनची निर्यात झाली नाही तर तेथील शेतकरी अडचणीत येऊन अमेरिकेत मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे.
चीनवर 100 टक्के टॅरिफ
आपल्यालाच शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा होती, मात्र नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिल्यामुळे आधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी निराशा झाली आहे, त्यातच चीनने अमेरिकेला होणाऱ्या रेअर अर्थ मिनिरलचा पुरवठा थांबवल्यानं आणि सोयाबीन खरेदी देखील थांबवल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच तीळपापड झाला आहे, त्यांनी आता चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, मात्र त्याचा फारसा परिणाम हा चीनवर होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे, मात्र चीनने सोयाबीन खरेदी थांबवल्यामुळे अमेरिका चांगलीच अडचणीत आली आहे. एकीकडे गाझा युद्ध तर थांबलं, मात्र दुसरीकडे आता हे नवं व्यापर युद्ध पेटण्याची शक्यता आहे.