अचानक चिप्सचं पॅकेट फुटलं… थेट मुलाचा डोळाच गेला, धक्कादायक घटनेने सर्वच हादरले
चिप्स... कुरकुरे... असे पॉकेट फुड मुलांना प्रचंड आवडतात. पण ते फक्त लहान मुलांच्या आरोग्यास चांगलं नाही तर, धोकादायक देखील आहे. अचानक फुटलेल्या चिप्सच्या पॅकेटमुळे चिमुकल्याचा थेट डोळाच गेला... या घटनेमुळे सर्वत्र हादरले आहेत.

पॅकेटमध्ये असलेले चिप्स सर्वांना आवडतात. विशेषतः मुलांना प्रचंड अवडतात. पण तुम्ही देखील मुलांनी चिप्सतं पॉकेट देत असाल तर… आजच ते देणं बंद करा. चिप्स मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक तर नाहीच, पण यामुळे त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि असं झालं देखील आहे. चिप्सचं पॅकेट फुटल्यामुळे चिमुकल्याच्या डोळ्यांना इजा झाली आहे. यामध्ये थेट मुलाचा डोळाच गेला… आनंदाने खेळणाऱ्या मुलाचं आयुष्य एका चिप्सच्या पॉकेटमुळे पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. मुलाची दृष्टी गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ओडिशाच्या बालनगीर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे चिप्सच्या पॅकेटच्या स्फोटाने एका आठ वर्षांच्या निष्पाप मुलाचं आयुष्य कायमचं बदललं. सोमवारी टिटलागड पोलीस स्टेशन परिसरातील शागरघाट गावात झालेल्या या अपघातात एका मुलाने आपल्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गमावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा लब हरपाल याचा मुलगा आहे. गावातील एका दुकानातून त्याने चिप्सचं पॅकेट खरेदी केलं आणि घरी परतला होता. तेव्हा मुलाची आई स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. शेगडी सुरु असताना, मुलाची आई पाणी भरण्यासाठी बाहेर गेली. संध्याकाळी ट्यूशनवरून घरी आल्यानंतर मुलगा चिप्स खाण्यासाठी जात होता…
यवेळी, मुलगा हातात चिप्सचं पॅकेट घेऊन शेगडीजवळ गेला. अचानक, त्याच्या हातातून ते पॅकेट निसटलं त्यानंतर ते पॅकेट आगीच्या संपर्कात आलं आणि मोठ्या आवाजात त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की, मुलाच्या चेहऱ्यावर त्याचा फटका बसला. या स्फोटात मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठं नुकसान झालं आहे.
स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर मुलाची आई धावत पळत घरात आली आणि तिला तिचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. अशात तात्काळ मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तपासणीनंतर, डॉक्टरांनी सांगितलं, डोळ्याची दुखापत इतकी गंभीर होती की, मुलाची दृष्टी परत येऊ शकत नाही. हे ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसला.
मुलाची आई भानुमती म्हणाली, ‘बिस्किट आणण्यासाठी मुलाला पैसे दिले होते. पण तो चिप्स घेऊन आला. मुलांसाठी तयार करण्यात येणारे प्रॉडक्ट इतके घातक कसे असू शकतात…’, असा प्रश्न देखील मुलाच्या आईने उपस्थित केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी चिप्स उत्पादक कंपनीविरुद्ध तितलागड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
