जगातले एकमेव मंदिर, येथे भक्त मागतात ‘मृत्यु’! पूजा केल्यानंतर 24 तासांत रिझल्ट,महिमा अगाध…

या धार्मिक नगरीच्या कणकणात शिव चैतन्य वसले आहे. येथील एका मंदिराचा महिमा अगाध आहे. या मंदिरात आरोग्यासाठी नव्हे तर मोक्ष मिळवण्यासाठी नवस केले जाते. .

जगातले एकमेव मंदिर, येथे भक्त मागतात मृत्यु! पूजा केल्यानंतर 24 तासांत रिझल्ट,महिमा अगाध...
| Updated on: Jun 01, 2025 | 5:27 PM

आपण नेहमी मंदिरात आपले आणि आपल्या कुटुंबाचे चांगले व्हावे,आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे अशा कामना देवाकडे करीत असतो. त्यासाठी देवाला नारळ आणि प्रसाद चढवतो. आणि देवाला चांगले आरोग्य आणि धनदौलत मिळावी यासाठी नवस मागत असतो. परंतू जगात एक असे मंदिर आहे. जेथे मृत्यूचा आशीर्वाद मागितला जातो.यासाठी त्या व्यक्तीच्या नावाने दिवा लावला जातो. अशी मान्यता आहे की २४ तासांत त्या व्यक्तीची या मोहमयी दुनियेतून मुक्तता मिळून त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो.

हे अनोखे मंदिर शिप्रा नदीच्या राम घाटावर आहे. त्याचे नाव धर्मराज आणि चित्रगुप्त मंदिर असे आहे. कारण, धर्मराज आणि चित्रगुप्त हे दोन देव येथे आहेत. हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. दररोज सायंकाळी शेकडो भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात. मनुष्यप्राण्याचा अनेकदा शारीरिक व्याधींमुळे जीवन आणि मृत्यूमध्ये संघर्ष सुरु असतो. अशा परिस्थितीत, अशा व्यक्तींची या मनुष्य योनीच्या फेऱ्यातून सुटका मिळावी, त्याला मोक्ष मिळविण्यासाठी या मंदिरात पूजा करण्यासाठी भाविक दूरदूरवरुन येत असतात,असे पंडित राकेश जोशी यांनी सांगितले. विषेश म्हणजे पूजा केल्यानंतर लगेच २४ तासांच्या आत परिणाम दिसून येतात…

दिवा लावल्याने देवता प्रसन्न होतात!

मंदिरात पूजा करून अनेकांना आरोग्याचाही फायदा झाला आहे. तसेच, तुपाचा दिवा देवता धर्मराज आणि चित्रगुप्त यांना प्रसन्न करतो. येथे तुपाचा दिवा लावण्याची प्रथा आहे. ज्या व्यक्तीला शारीरिक वेदना होत आहेत आणि तो बरा होऊ इच्छितो किंवा मोक्ष मिळवू इच्छितो, तो येथे तुपाचा दिवा लावतो. यामुळे त्याच्या सर्व वेदना दूर होतात आणि मोक्ष मिळतो. दररोज हजारो भाविक येथे येत असतात असे पंडित राकेश जोशी यांनी सांगितले.

प्राचीन मंदिर

कर्कवृत्त या मंदिराच्या वरून जाते, म्हणून मंदिराला विशेष महत्त्व दिले जाते. जोशी यांचे पूर्वज गेल्या ४०० वर्षांपासून मंदिरात पूजा करत आहेत. १७०२ मध्ये देखील येथे पूजा केल्याचे पुरावे आहेत. देशभरातून भाविक रोग आणि विविध दोषांपासून मुक्त होण्यासाठी येथे येतात असेही पंडित जोशी यांनी सांगितले.