जंतरमंतरवर आंदोलनासाठी बंदी, तर रामलीला मैदानावरही मोठी आर्थिक कोंडी, इतके दिवसच मैदान मोकळे
Jantar Mantar-Ramlila Maidan: दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करण्यास प्रशासनाने बंदी घातली. रामलीला मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली असली तरी त्यासाठी आयोजकांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे हे मैदानासाठी तारखी अगोदरच बुक झाली आहे.

Jantar Mantar-Ramlila Maidan: यापुढे जंतरमंतरवर आंदोलन करता येणार नाही. दिल्ली पोलीस आयुक्तांनी 11 ऑक्टोबर रोजी याविषयीचा आदेश काढला. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील CBD मैदानावर आंदोलन करता येईल. रामलीला मैदानावर सभा घेणे अत्यंत खर्चिक आणि कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आगामी दसरा आणि दिवाळीमुळे हे मैदान पुढील अडीच महिन्यांसाठी अगोदरच बुक झाले आहे. केवळ डिसेंबर महिन्यातील अखेरचे 29, 30 आणि 31 डिसेंबर हे तीनच दिवस बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.
एकाचवेळी 50 हजार एकत्र, पण बुकिंगचा खर्च लाखात
दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील या 12 एकरावरील मैदानात एकाच वेळी 50 हजार लोक एकत्र येऊ शकतात. पण त्यासाठी भाड्याचा आकार मोठा आहे. रामलीला मैदानासाठी एका दिवसाचा खर्च खिसा कापणार आहे. एका दिवसाच्या बुकिंग चार्जसाठी 50 हजार रुपये, अनामत रक्कम म्हणून 55 हजार रुपये आणि त्यावरील विविध कर मिळून आयोजकाला एका दिवसासाठी जवळपास 1.21 लाख रुपये खर्च येतो. अर्थात सध्या मैदानातील एक भाग आंदोलनासाठी उपलब्ध आहे. पण तिथे केवळ 150 लोक जमा होतील इतकीच जागा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या मैदानासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. पण त्यासोबत पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असते.
यापूर्वीच रामलीलावर आंदोलनाची हाक
ऑक्टोबर 2018 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) सर्वोच्च न्यायालयालात जंतर-मंतरवरील आंदोलने, धरणे बंद करण्याची विनंती केली होती. स्थानिक रहिवाशांनी येथील ध्वनी प्रदूषण आणि अस्वच्छ वातावरणावर टीका करत हे ठिकाण आंदोलनासाठी बंद करण्याची मागणी केली होती. येथून 4 किमी दूर अंतरावरील रामलीला मैदानावर आंदोलनासाठी जागा देण्याचे निर्देशही देण्यात आले होते. आता संसद आणि इतर महत्त्वाच्या कार्यालयाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी नाकारत रामलीला आणि इतर दोन पर्याय आंदोलनासाठी उपलब्ध करून देण्यात आले.
तलाव बुजवून मैदानाची निर्मिती
1930 पर्यंत या मैदानावर एक तलाव होता. तो बुजवण्यात आला. सपाटीकरण करुन तिथे मैदान तयार करण्यात आले. सुरुवातील तिथे रामलीला सादरीकरण करण्यात आले. त्यावरून मैदानाला रामलीला मैदाना नाव पडलं. तर पुढे हे मैदान अनेक ऐतिहासिक सभांचं साक्षीदार ठरले. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, अरविंद केजरीवाल यांच्या सभा या ठिकाणी झाल्या.
