AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Delhi protest : दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; हजारो आंदोलक…

दिल्लीच्या जंतर-मंतरवर पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी त्या भागात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

CJP Delhi protest : दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; हजारो आंदोलक...
cjp delhi protest Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 7:31 PM
Share

CJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला देशातून मोठा प्रतिसाद मिळतोय. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत आहेत. काहीही झालं तरी आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणारच, असा निर्धार या आंदोलकांनी व्यक्त केलाय. विरोधकांनीही या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा धारण केलाय. अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता गांधी स्मृती भवनाकडे निघाले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे आता जंतर-मंतरवरी घडामोडी वाढल्या आहेत. जंतर-मंतरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

जंतर-मंतरवर नेमकं काय घडतंय?

जंतर मंतर मैदानावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हे आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक तरुण हे जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेले आहेत. अधून मधून अभिजित दीपके हे आंदोलकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु सध्या जंतर मंतरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलक काहीसे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या भागात पोलीसही आक्रमक झाले आहेत. वातावरण चिघळू नये म्हणून जंतर मंतरवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

सीजेपीने केली मोठी घोषणा

दुसरीकडे सीजेपीने हे आंदोलन आता देशव्यापी करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीजेपीने मोठी घोषणा केली आहे. 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलन केले जाईल, असे सीजेपीने सांगितले आहे. या आंदोलनाची तयारीही चालू झाली आहे. सीजेपीच्या या घोषणेमुळेही सध्या केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे. दुसरीकडे आम्ही सीजेपीसोबत कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. संसदेतही आम्ही सर्व विषयावर चर्चा करू असे सत्ताधारी मोदी सरकारने विरोधकांना सांगितलेले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता नेमके काय होणार? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच